टीव्ही अभिनेत्री नंदिनी सीएम हिच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अवघ्या २६ वर्षांच्या वयात तिची करिअरची स्वप्ने अपूर्ण राहिली. आपल्या वेदना, भावना व्यक्त करणारी एक नोट पोलिसांना आढळली आहे.
TV Actress Nandini CM end of life
२६ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने आपले जीवन संपवले असून तिने पालकांनी तिच्यावर अभिनय करिअर सोडण्याचा, लग्नासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. कन्नड आणि तमिळ टीव्ही अभिनेत्री नंदिनी सीएमने तिच्या बेंगळुरू येथील राहत्या खोलीत आपले जीवन संपवले. पोलिसांना एक नोट सापडली असून त्यामध्ये तिने तिच्या पालकांनी अभिनय सोडून सरकारी नोकरी स्वीकारावी, लग्न करण्याचा दबाव आणल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
नंदिनी सीएम विषयी ...
नंदिनी मूळची कोट्टूरची राहणारी आहे. ती कामानिमित्त बंगळुरुमध्ये राहायची. तिने टेलीविजन जगतात यशस्वी करिअरला सुरुवात केली होती. जीवा हूवागिदे, संघर्ष, मधुमगुलु, नीनाडे ना यासारख्या कन्नड मालिकांमध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली.
तिने मेहनत घेऊन इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख बनवली होती. नंदिनीने २०१८ मध्ये बल्लारी येथून पीयूसी (प्री-युनिव्हर्सिटी) पूर्ण केले होते. चित्तकनबनावरा येथील आरआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू केले होते. परंतु नंतर तिने ते सोडून दिले.
सरकारी नोकरीची ऑफर
नंदिनीच्या वडिलांचे २०२१ मध्ये निधन झाल्यानंतर तिला २०२३ मध्ये तालुका कार्यालयात सरकारी नोकरीची ऑफर मिळाली होती. पण, तिच्या कुटुंबाची मागणी न जुमानता, तिने नोकरी नाकारली आणि अभिनयाची वाट धरली. अभिनय क्षेत्रात तिची स्वप्ने पूर्ण करण्याचा तिने निर्णय घेतला.
पोलिसांनी काय सांगितलं?
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, २८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११:२३ वाजता नंदिनीने तिच्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला. जेव्हा ती फोन उचलत नव्हती, तेव्हा पीजी मॅनेजरच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. ती दुपट्ट्यासह खिडकीच्या ग्रिलला लटकलेली दिसली. प्राथमिक तपासानुसार, २८ डिसेंबर रोजी रात्री ११:१६ ते २९ डिसेंबर रोजी पहाटे १२:३० च्या दरम्यान नंदिनीचा मृत्यू झाला. सकाळी ९:१५ च्या सुमारास पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली या प्रकरणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.