मुंबई: पुढारी ऑनलाईन
'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेतील वहिनी साहेब अर्थात नंदिता वहिनींची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर हिने काही दिवसापूर्वी सुंदर व्हिडिओ शेअर करत आपल्या चाहत्यांना 'गुडन्यूज' दिली होती. तिच्या या प्रेग्नेंसी व्हिडिओची चर्चा रंगली असतानाच आता तिच्या बेबीबंप फोटोशुटचीही चर्चा मराठी सिनेसृष्टीत चांगलीच रंगली आहे.
गीता गोविंदम या तमिळ चित्रपटातील "इंकेम इंकेम" या प्रसिद्ध गाण्याचे संगीत देत धनश्रीने बाळाच्या आगमनाची चाहुल लागल्यावर स्त्रीच्या आयुष्यात जे बदल होतात. ते बदल, तो आनंद व्हिडिओतुन शेअर धनश्रीने चाहत्यांना गोड बातमी दिली होती.
यानंतर तिने बेबीबंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहे. या फोटोमध्ये तिने हिरव्या पिवळ्या ठिपक्यांचा स्टायलिश ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती अधिकच खुलुन दिसत आहे. बेबीबंपचे फोटो शेअर करत तिने एक कॅप्शनदेखील दिली आहे. सध्या तिचे हे फोटोशूट व्हायरल होत आहे. कोरोना काळात धनश्री व तिच्या पतीने प्री-प्रेग्नंसी फोटोशूट केले आहे.
धनश्री मुळची पुण्याची असून तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर २०१३ मध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या दुर्वेश देशमुख सोबत धनश्रीचे लग्न झाले.
'तुझ्यात जीव रंगला'मधील वहिनीसाहेब या भूमिकेमुळं धनश्री काडगांवकरचा प्रचंड मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.मालिकेत तिची निगेटीव्ह भूमिका असली तरी आपल्या खास अंदाजात तिने ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती. तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना चांगलाच भावला होता.