मुंबई: पुढारी ऑनलाईन
तुझ्यात जीव रंगला मालिका फेम धनश्री काडगावकर सध्या तिच्या प्रेग्नेंसी चांगलीच चर्चेत आली आहे. धनश्री प्रेग्नेंट असतानादेखील सोशल मीडियावर मोळ्याप्रमाणात ॲक्टिव्ह असते. दरम्यान, नुकताच तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Baby shower by loved once… अशी कॅप्शन देत धनश्रीने डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने फिकट सिल्हर ग्रीन रंगाचा वनपीस परिधान केला आहे.
बेबी शॉवरच्या या फोटोंमध्ये धनश्रीच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा आहे.
यापूर्वी तिने बेबी बंप फ्लॉन्ट करत न्यू इयरची सेलिब्रेशन केल होत
पतीच्या वाढदिवसाच्याच दिवशी धनश्रीने आई होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. ही गुड न्युज शेअर करताच चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला होता. धनश्री मुळची पुण्याची असून तिचे सासरसुद्धा पुण्यातच आहे. डिसेंबर 2013 मध्ये व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले होते.