Tripti Dimri  
मनोरंजन

Tripti Dimri : तृप्ती डिमरी पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये !

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अॅजिओच्या चौथ्या आवृत्तीत बॉलिवूडमधील ग्लॅमरस कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली. बीकेसीमध्ये रंगलेल्या या शानदार सोहळ्यात जॅकलिन फर्नांडिस, तृप्ती डिमरी ( Tripti Dimri ) , श्रद्धा कपूर, सोनल चौहान, माहिरा शर्मा, जिया शंकर, जस्मीन भसीन-अली गोनी, अर्जुन कपूर यांचा यात प्राधान्याने समावेश राहिला.

संबंधित बातम्या 

जॅकलिन फर्नांडिस यावेळी अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसून आली. अलीकडे ती सोशल प्लॅटफॉर्मपासून बरीच दूर असून, कोणत्याही छोट्या-मोठ्या इव्हेंटमध्ये भाग घेणे तिने कटाक्षाने टाळले. येथे मात्र तिने आवर्जून हजेरी लावली आणि यामुळे ती चर्चेत येणे साहजिक होते. तृप्तीने ( Tripti Dimri )  येथील इव्हेंटमध्ये मास्क घालून रॅम्प वॉक केला आणि नंतर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरलही झाला.

'अॅनिमल' चित्रपटातील भूमिकेनंतर ती विशेष चर्चेत आहे. तृप्तीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'पोस्टर बॉईज' या चित्रपटाच्या माध्यमातून केली, हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला होता. २०१८ मधील 'लैला मजनू' चित्रपटाने त्यांच्या टीकाकारांचीही मने जिंकली. त्यानंतर २०२० मध्ये 'बुलबुल' व २०२२ मध्ये 'कला' चित्रपटातही तिने अभिनयाची उत्तम चुणूक दाखवली. अर्थात, तिने खास ओळख मात्र 'अॅनिमल' या चित्रपटाच्या माध्यमातूनच मिळवली, हेही तितकेच खरे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT