Trisha Krishnan Post: अभिनेता जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी (१० मे) शपथ घेतली. या शपथविधीला अभिनेत्री त्रिशा कृष्णनची देखील उपस्थिती होती. विजय मुख्यमंत्री होण्यापूर्वीपासूनच त्रिशा आणि विजयन यांचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यातच विजयने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याच्या दृष्टीकोणातून कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.
विजयच्या टीव्हीकेने अनेक प्रयत्नांनतर तमिळनाडूत सत्ता स्थापनेसाठी संख्याबळाची जुळवा जुळव केली. यानंतर रविवारी त्याचा शपथविधी पार पडला. या शपथविधीला अनेक दिग्गज लोक उपस्थित होते. मात्र अभिनेत्री त्रिशाची उपस्थिती सर्वाधिक लक्षवेधी ठरली.
दरम्यान, त्रिशाने शपथविधीनंतर दुसऱ्या दिवशी आपल्या सोशल मीडियावरून शपथविधी सोहळ्यावेळी परिधान केलेल्या साडीतील अनेक फोटो शेअर केले. या सोहळ्यासाठी त्रिशाने हिवर्या रंगाची साडी आणि त्यावर गोल्डन रंगाचे ब्लाऊज घातले होते. तिने केसात पांढगा गजरा देखील माळला होता. तिचा लूक पारंपरिक होता. त्याला साजेशी अशी ज्वेलरी देखील तिनं घातली होती.
मात्र तिने फोटो शेअर करून त्याला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. तिने या फोटो पोस्टला 'द लव्ह इज ऑलेवज लाऊडर ' (प्रेमाचा आवाज नेहमी मोठा असतो.)
त्रिशा ही दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री असून तिने आपणात राजकारणात देखील रस असल्याचे एका मुलाखतीत सांगितलं होतं. आता विजय दोन सीटवरून निवडणूक जिंकला आहे. मात्र त्याला एका ठिकाणी राजीनामा द्यावा लागणार आहे. त्या जागेवर त्रिशा निवडणूक लढवण्याची शक्यात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी विजयची मुख्यमंत्री पदी नियुक्ती केली आहे. आता त्याला १३ मे पूर्वी विधानसभेत आपलं बहूमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे.
विजय यांचा पक्ष टीव्हीके (तमलिगा वेट्री कझगम) ने १०८ जागांवर विजय मिळवला आहे. त्यांना ५ आमदारांच्यासह काँग्रेसने पाठिंबा दिला असून सीपीआय, सीपीआय(एम) आणि व्हीसिके, इयुएमएल या पक्षांनी देखील पाठिंबा देत बहूमताच्या आकड्याच्या पार पोहचवले.