यशच्या बहुचर्चित 'टॉक्सिक' चित्रपटातील दुसरे गाणे 'मधोश' रिलीज झाले असून, यात यश आणि तारा सुतारियाची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. पहिल्या 'तबाही' गाण्याच्या तुलनेत 'मधोश' अधिक भावनिक आणि संथ रोमँटिक ट्रॅक आहे.
'टॉक्सिक'मधील 'मधोश' गाणे प्रदर्शित झाले असून यामध्ये साऊथ सुपरस्टार यश आणि बॉलिवूड दीवा तारा सुतारियाची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरलीय. हे एक रोमँटिक ट्रॅक आहे. "तेरी नजरों से नजरें मिलें, क्या बदलने लगा, ये..." असे गाण्याचे बोल आहेत.
या गाण्याला तनिष्क बागची, फहीम अब्दुल्ला आणि अर्सलान निजामी यांनी संगीत दिले आहे, तर सिद्धार्थ बसुरूरने आपला आवाज दिला आहे. या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ॲक्शन आणि डार्क वातावरणाची झलक दाखवणाऱ्या पहिल्या 'तबाही' गाण्यानंतर आता 'मधोश'मधून चित्रपटातील प्रेमकथेची आणखी एक वेगळी बाजू समोर आली आहे.
यश आणि तारा सुतारियाची प्रेमकहाणी
'मधोश'मध्ये यश आणि तारा सुतारिया यांच्यातील कोमल आणि हळूवार नात्याची झलक पाहायला मिळते. चित्रपटात यश 'राया', तर तारा 'रेबेका'ची भूमिका साकारत आहे. गाण्यातील दोघांचे भावनिक क्षण कॅमेराबद्ध करण्यात आले आहेत. तबाही या पहिल्या गाण्याच्या तुलनेत 'मधोश'चा अंदाज अधिक शांत, हळवा.
'तबाही'पेक्षा वेगळा अनुभव
याआधी रिलीज झालेल्या 'तबाही' गाण्यात कियारा अडवाणीसोबत चित्रपटात नात्याची एक वेगळी झलक दाखवण्यात आली होती. गीतू मोहनदास दिग्दर्शित 'टॉक्सिक' हा चित्रपट २६ ऑगस्ट २०२६ रोजी जगभरात हा चित्रपट रिलीज होणार आहे. यशचा केजीएफ चॅप्टर २ नंतरचा हा पहिलाच चित्रपट असून, त्यात ॲक्शन, रोमान्स आणि थरार पाहायला मिळणार आहे.
दुसरीकडे, नयनतारा यशसोबत सिगारेट ओढताना आणि क्षितिजाकडे पाहताना दिसते. दरम्यान, साऊथ स्टार यश नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटात रावणच्या भूमिकेतही झळकणार आहे.