पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने 'बिग बॉस' रिअॅलिटी शोची ऑफर नाकारली आहे. यावर कामराने "हे एक मनोरुग्णालय आहे, जिथला डॉक्टर म्हणजेच सलमान खान आहे', असे त्याने त्याच्या सोशल मीडिया एक्स अकाऊंटवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. कामराच्या या पोस्टची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाण्यातून टीका केल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्या विरोधात शिवसेना आमदाराने खार पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. त्यानंतर बुक माय शो (BookMyShow) प्लॅटफॉर्मनेदेखील कामराच्या शो तिकिट विक्रिसाठी बंदी घातली. दरम्यान 'बिग बॉस'कडून कॉमेडियन कुणाल कामरा याला ऑफर देण्यात आली. पण त्याने ती नाकारली आहे.
कॉमेडियन कुणाल कामराच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्याला 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचा भाग व्हायला आवडेल का असे कास्टिंग डायरेक्टरने अलीकडेच त्याला विचारले. यावर कामराने उत्तर दिले, मेंटल हॉस्पिटलमध्ये जाणं पसंत करेन', असे म्हटले आहे. कामरा याने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "बिग बॉस हे एक मानसिक रुग्णालय आहे, जिथे डॉक्टर म्हणजेच सलमान आठवड्यातून दोन दिवस रुग्णांना भेटण्यासाठी येतो 😂😂😂". या वाक्यासोबत कामराने स्मायली फेसदेखील शेअर केल्या आहेत.
बिग बॉस हा भारतातील बिग बॉस फ्रँचायझीचा एक भारतीय हिंदी भाषेतील रिॲलिटी टेलिव्हिजन शो आहे, जो कलर्स टीव्हीवर प्रसारित होतो. हे एन्डेमोलने विकसित केलेल्या बिग ब्रदरच्या डच स्वरूपावर आधारित आहे. 3 नोव्हेंबर 2006 रोजी प्रीमियर झाल्यापासून, शोने अठरा सीझन आणि तीन ओटीटी सीझन पूर्ण केले आहेत. आता येणारा १९ वा सीझन आहे.
बिग बॉस ही एक लोकप्रिय रिअॅलिटी शो मालिका आहे. या शोमध्ये विविध सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध व्यक्तींना एका खास तयार केलेल्या घरात ठेवले जाते. त्यांना घराबाहेर जाण्याची परवानगी नसते आणि ते २४ तास कॅमेर्यांच्या निगराणीखाली असतात. प्रत्येक आठवड्याला काही स्पर्धक नॉमिनेट केले जातात आणि प्रेक्षकांच्या मतांवरून एक स्पर्धक घरातून बाहेर पडतो. शेवटी सर्वाधिक दिवस घरात टिकणारा स्पर्धक विजेता ठरतो. हा शो मनोरंजन, संघर्ष, मैत्री आणि नाट्यपूर्ण प्रसंगांसाठी ओळखला जातो.