पुढारी ऑनलाईन डेस्क - फराह खान हिने हॉलिवूड स्टार टॉम क्रुजसोबत काम करण्याची इच्छा जाहीर केली. याआधी फराहने ओम शांती ओमचे दिग्दर्शन केले आहे. दरम्यान फराह खान पुन्हा चर्चेत आली. स्टार टॉमच्या फोटोवर तिने कॉमेंट केली आहे. दरम्यान, नेटकरीही तर्क-वितर्क लावताहेत.
टॉमने एक फोटो शेअर केला, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये टॉम अंडरवॉटर ट्रेनिंग घेताना दिसतो आहे. हा फोटो फराहला देखील आवडला. तिने फोटोवर कॉमेंट केली. खरंतर हा फोटो त्याच्या मिशन : इम्पॉसिबल - द फायनल रेकनिंगच्या दरम्यानचे बीटीएस फोटो आहे.
टॉम अंडरवॉटर स्टंटसाठी प्रशिक्षण घेताना दिसत आहे. त्याची एक झलक गुप्तहेर थ्रिलरच्या ट्रेलरमध्ये देखील दिसली होती. या फोटोमध्ये टॉम पाणी स्टंट ट्रेनर ऑक्सीजन टँकसाठी श्वास घेताना पाहिलं जाऊ शकतं. तर बॅकग्राऊंटमध्ये एक मोठी लाईट दिसते. ही पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय-, “आम्ही चित्रपटात जे प्रशिक्षण आणि तयारी केली आहे, ते याआधीच्या सर्व गोष्टींचे समापन आहे. ...तुमच्यासोबत अधिक शेअर करण्यासाठी प्रतीक्षा नाही करू शकत.”
या फोटोवर कॉमेंट करत फराहने लिहिले- टॉम...तुमच्या सोबत काम करण्यासाठी प्रतीक्षा करत आहे. फराहच्या या कॉमेंटनंतर फराह टॉमसोबत चित्रपट करणार असा अंदाज लावला जात आहे.