नवी दिल्ली : हॉलिवूडचा प्रख्यात अभिनेता टॉम क्रुझ याने बॉलिवूड विषयी आपले प्रेम व्यक्त केले आहे. एका मुलाखती दरम्यान त्यांने चक्क हिंदीत काही वाक्य बोलत आपल्या भावना व्यक्त केल्या. मै आपसे बहूत प्यार करता हॅूं , आय लव्ह यू बॉलिवूड असे तो म्हणताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे.
मिशन इंपॉसिबल या सिरीजमधला मिशन इंपॉसिबल फायनल रेकॉनिंग हा त्याच चित्रपट आज जगभरात प्रदर्शित झाला. मिशन इंपॉसिबल व टॉम क्रुझचे जगभरात कोट्यवधी चाहते आहे. तसेच भारतातही टॉम क्रुझ खूपच लोकप्रिय आहे.
या चित्रपटात त्याने अनेक खतरनाक स्टंट केले आहेत हॅलिकॉप्टरमधून दहा हजार फुटावरुन उडी मारण्याचा त्याचा व्हिडीओ शूक्रवारी चांगलाच व्हायरल झाला. या पार्श्वभूमीवर त्याचे बॉलिवूड भारत याच्याविषयी भाष्य केलेले हे रिल्सही आता व्हायरल होत आहे.
पुढे तो म्हणतो मला बॉलीवूड मुव्ही खूप आवडतात त्यातील गाणी तर ब्रेक आऊट असतात. तसेच मला अशा बॉलिवूड स्टाईल चित्रपट बनवायलाही आवडेल असेही टॉम क्रुझ म्हणतो. तसेच भारताविषयी बोलतना तो म्हणाला की मला भारताविषयी खूप प्रेम आहे. ही अमेझिंग कंट्री आहे, येथील लोक व संस्कृती खूपच सुंदर आहे. मला आजही ताज महल ला भेट दिलेली आठवते. तसेच मुंबईतही काही दिवस मी मुक्काम केला आहे असे म्हणत त्याने भारताविषयीच्या आठवणी सांगितल्या.
पुढे त्यांने म्हटले की मला भारतात फिल्म बनावयला आवडेल, तसेच अशा फिल्म बनवण्यसाठी जे कौशल्य लागते ते तुम्हा भारतीयांमध्ये खूपच नैसर्गिक आहे. त्याने सांगितले. बॉलिवूड चित्रपटातील हिरो गाणी म्हणतो, डान्स करतो हे खूपच युनिक आहे. असेही तो म्हणाला. शेवटी टॉम क्रुझ याने ‘मै चाहता हॅूं तूम मुझपर भरोसा करो एक आखरी बार’ असा हिंदी डायलॉगही म्हणून दाखवला.
दरम्यान टॉमचा आज प्रदर्शित झालेला मिशन इंपॉसिबल mission impossible the final reckoning हा चित्रपट त्याच्या यावर्षीचा बीग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ४०० मिनियन डॉलर्स (3400 कोटी रुपये) इतका खर्च आला आहे.