पुढारी ऑनलाईन डेस्क - टीव्ही, बॉलीवूड अभिनेते टीकू तलसानिया यांची अचानक तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले.
त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. टीकू तलसानिया ७० वर्षांचे आहेत. त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कुठलीही हेल्थ अपडेट समोर आलेली नाही.
टीकू तलसानियाचा जन्म १९५४ मध्ये झाला होता. टीव्ही विश्वात अभियानंतर त्यांनी चित्रपटांमध्येही काम केल आहे. १९८४ मध्ये लोकप्रिय मालिका 'ये जो है जिंदगी' तून त्यांनी अभिनय विश्वात पदार्पण केले. १९८६ मध्ये चित्रपट 'प्यार के दो पल' मधून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. टीकू तलसानिया कॉमिक रोल्ससाठी ओळखले जातात.
'एक से बढकर एक', 'हुकूम मेरे आका', 'गोलमाल है भाई सब गोलमाल है', 'प्रीतम प्यारे और वो', 'सजन रे झूठ मत बोलो' मध्ये त्यांनी काम केलंय. 'दिल है कि मानता नही', 'बोल राधा बोल', 'अंदाज अपना अपना', 'इश्क', 'देवदास', 'पार्टनर', 'धमाल', 'स्पेशल २६' यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे.