मनोरंजन

Tiger Shroff : WPL 2024 च्या उद्घाटन समारंभात टायगर श्रॉफचा जलवा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे. (Tiger Shroff ) नुकत्याच झालेल्या वुमेन्स प्रीमियर लीग 2024 च्या उद्घाटन समारंभात टायगर ने त्याच्या दमदार परफॉर्मन्स ने प्रेक्षकांना मोहित केलं आहे. (Tiger Shroff )

टायगर हा त्याच्या अभिनयाच्या सोबतीने उत्तम डान्सर म्हणून ओळखला जातो यात शंका नाही २०२४ मधल्या या खास इव्हेंटमध्ये त्याने धमाकेदार परफॉर्मन्सने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. डोळ्याचं पारणं फेडणारा हा कार्यक्रम आणि टायगरचा खिळवून ठेवणारा परफॉर्मन्स या कार्यक्रमाला चार चाँद लावून गेला आहे आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांनी #TheTigerEffect अनुभवला आहे.

अफलातून स्टंट्सने टायगरने पुन्हा एकदा सिद्ध केले की, तो मनोरंजनाच्या जगात एक बेस्ट अभिनेता आहे. या खास इव्हेंटच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करण्याचा अनुभव सांगताना टायगरने WPL 2024 चे आयोजक आणि प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
टायगर व्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्रा, कार्तिक आर्यन, वरुण धवन आणि शाहिद कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनीही आपापल्या लोकप्रिय गाण्यांवर त्यांच्या परफॉर्मन्सने मंचावर लक्ष वेधले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि सुपरस्टार शाहरुख खानने केलं.

टायगर त्याच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत असून ज्यामध्ये तो आणि अक्षय कुमार पहिल्यांदाच दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी ईदला रिलीज होणार आहे. सोबतीला टायगर लवकरच 'सिंघम अगेन' मध्येही ॲक्शन अवतारात दिसणार आहे.

SCROLL FOR NEXT