Janhvi Kapoor Tiger Shroff Raj Mehta Karan Johar film Lag Jaa Gale
मुंबई - गुड न्यूज, जुग जुग जियो नंतर दिग्दर्शक राज मेहता 'लग जा गले' चित्रपट घेऊन येताहेत. चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार असून या रोमँटिक ॲक्शन ड्रामामध्ये टायगर श्रॉफ -जान्हवी कपूर पहिल्यांदाच एकत्र दिसतील. मीडिया रिपोर्टनुसार, "लग जा गले" एक बदला घेणारी ॲक्शन लव्ह स्टोरी आहे आणि राज मेहता दीर्घकाळ या स्क्रिप्टवर काम करत आहेत. त्यांनी टायगर-जान्हवीला कथा ऐकवल्यानंतर दोघांनीही तत्काळ होकार दिला.
सूत्रांच्या माहितीनुसार, "टीमने अनेक पर्यांयावर विचार करून चित्रपटाचे टायटल ठरवलं. एक हाय-ऑक्टेन रिवेंज ड्रामा" लग जा गलेचे शूटिंग २०२५ च्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. २०२६ च्या दुसरी सहामाहीत चित्रपट रिलीज करण्याचे निर्मात्यांचे लक्ष्य आहे.
टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट बागी ४ असेल. या चित्रपटामध्ये संजय दत्त आणि सोनम बाजवा देखील असतील. दुसरीकडे जान्हवी कपूरचा 'परम सुंदरी' चित्रपट आहे. चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा देखील असणार आहे. जान्हवी 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' नावाचा चित्रपट देखील आहे. याशिवाय जान्हवीचा पुढील वर्षी रिलीज होणारा दाक्षिणात्य चित्रपट 'पेड्डी' देखील आहे. यामध्ये ती राम चरण सोबत दिसणार आहे.