Tiger Shroff car firing File Photo
मनोरंजन

Tiger Shroff car firing: टाइगर श्रॉफच्या कारवरील गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट; शूटरसाठी २ तरुणींनी केले होते खतरनाक प्लॅनिंग

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे.

मोहन कारंडे

Tiger Shroff car firing

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. या खळबळजनक प्रकरणाशी संबंधित चार जणांना पोलिसांनी अटक केली असून, यामध्ये गुन्हेगारांपर्यंत हत्यार पोहोचवणाऱ्या दोन तरुणींचाही समावेश आहे. या सर्व आराेपींना न्यायालयात हजर केल्यानंतर, मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

असा रचला गेला कट?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकताच जामिनावर बाहेर आलेला मुख्य आरोपी कुणाल याची ओळख अनिल पंडित नावाच्या व्यक्तीसोबत झाली होती. त्यानंतर हे दोघे एन्क्रिप्टेड ॲपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. अनिल पंडितच्या सूचनेनुसार, कुणालने सुमितच्या मदतीने अमृतसर येथून एक पिस्तूल आणि २० जिवंत काडतुसे गोळा केली होती.

याच दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी कुणालची भेट राधा हिच्याशी झाली. त्याने आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल सांगून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले आणि तिला हत्यारासह मुंबईला जाण्यासाठी तयार केले.

रेल्वे प्रवासापासून ते दादरमधील हॉटेलपर्यंत...

१५ ऑक्टोबर: कुणालने राधा आणि बबीता यांना नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर सोडले. यावेळी पिस्तूल राधाच्या बॅगेत लपवण्यात आली होती. प्रवासादरम्यान कुणाल एन्क्रिप्टेड ॲपद्वारे सतत राधाच्या संपर्कात राहून तिला अनिल पंडितच्या सूचना देत होता.

१७ ऑक्टोबर: दोन्ही तरुणी मुंबईतील दादर येथे उतरून एका हॉटेलमध्ये मुक्कामास राहिल्या. त्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हॉटेलबाहेर एका अल्पवयीन मुलाने राधाकडून ती बॅग ताब्यात घेतली.

१८ ऑक्टोबर: संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर अनिल पंडितने कुणालला फोन करून शूटर मुंबईत अडकल्याची माहिती दिली आणि त्यांना पळून जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

२० ऑक्टोबर: गोळीबार झाल्यानंतर राधा आणि बबीता हरिद्वार एक्सप्रेसने मुंबईहून दिल्लीसाठी रवाना झाल्या. दिल्ली पोलिसांनी धडक कारवाई करत राधा आणि बबीता यांना नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून, तर कुणाल आणि सुमित या दोघांना सोनिपत येथून बेड्या ठोकल्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT