पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्ना हिचा रविवारी (दि.३०) आपल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. तिच्या मृत्यूची वार्ता समजताच तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली असून साऊथ चित्रपटक्षेत्रात शोककळा पसरली आहे. (Shobhita Shivanna)
कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील सकलेशपूर येथील रहिवासी असलेल्या शोभिताचे लग्न झाले असून ती गेल्या दोन वर्षांपासून हैदराबाद येथे राहत होती. रविवारी (दि.३०) रात्री हैदराबादमधील कोंडापूर येथील राहत्या घरी तिने जीवन संपविले. ANI वृत्तानुसार, शोभिताने गळफास घेऊन जीवन संपविले, त्यावेळी तिथे कोणीच नव्हते. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तिचा मृतदेह शेवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला असून तिने जीवन का संपविले? यांचे कारण अद्याप समोर आलेले नाही. (Shobhita Shivanna)