They Call Him OG box office collection updates Instagram
मनोरंजन

OG box office collection: बॉक्स ऑफिसवर OG चे 'बल्ले-बल्ले', अवघ्या तीन दिवसांत २०० कोटी पार

They Call Him OG box office collection day 3: बॉक्स ऑफिसवर OG चे 'बल्ले-बल्ले', अवघ्या तीन दिवसांत २०० कोटी पार

स्वालिया न. शिकलगार

'दे कॉल हिम ओजी' स्टार पवन कल्याणचा पहिला चित्रपट आहे, जे जगभरात बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा आकडा पार केला आहे. चित्रपटाने ट्रेड रिपोर्टनुसार तीन दिवसात हा आकडा पार केला आहे.

They Call Him OG box office collection day 3

मुंबई - दक्षिणेचा सुपरस्टार पवन कल्याणचा बहुप्रतीक्षित चित्रपट दे कॉल हिम ओजी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या तीन दिवसांत २०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून बॉक्स ऑफिसवर भन्नाट विक्रम नोंदवला आहे. ट्रेड अॅनालिस्टच्या रिपोर्टनुसार, ओजीने देशांतर्गत आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये हा कोटींचा आकडा पार केला आहे.

गुरुवारी चित्रपटाने धमाकेदार सुरुवात केली. पण, दुसऱ्या दिवशी कमाईत ७० टक्के घट झाली. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने पुन्हा गती घेतली. रिपोर्टनुसार, पवन कल्याणचा नवा ॲक्शन ड्रामा 'दे कॉल हिम ओजी' हा पहिला चित्रपट ठरला आहे, जो तीन दिवसात इतक्या कोटींचा आकडा गाठला आहे. 'गेम चेंजर'ला देखील कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.

कमाईचे जादुई आकडे

तिसऱ्या दिवशी शनिवार, २७ सप्टेंबर रोजी 'दे कॉल हिम ओजी'ने भारतातत बॉक्स ऑफिसवर १८.५ कोटींची कमाई केली. तीन दिवसात भारतात १३७ कोटी तर परदेशात जवळपास ५५ कोटी रुपये कमावले.

चित्रपटाच्या दमदार अॅक्शन सीन्स, पवन कल्याणचा दमदार अभिनय, सुपर कथा यामुळे प्रेक्षकांसाठी थ्रिलचा अनुभव देणारा हा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी जेवढी कमाई केली, त्यावरून पुढील आठवड्यातही हा चित्रपट चांगला गल्ला जमवेल, असे चित्रपट समीक्षकांचा अंदाज आहे. दे कॉल हिम ओजीने केवळ दक्षिणेतच नव्हे तर हिंदी पट्ट्यातही चांगली कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरेल, असे म्हटले जात आहे.

ओजीने या चित्रपटांना टाकले मागे
सलमान खान स्टारर 'सिकंदर' चित्रपटाने १८४.६ कोटी कमावले होते. या कलेक्शनला देखील ओजीने मागे टाकले आहे. व्यंकटेशच्या 'संक्रांतिकी वस्तुनम'ने जगभरात २५५.२ कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपच बनला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT