अपूर्वा मखिजाला घाणेरड्या भाषेत बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या  Instagram
मनोरंजन

Apoorva Mukhija ला ॲसिड ॲटॅक, बलात्काराच्या धमक्या; स्क्रिन शॉट्स केले शेअर

India's Got Latent Controversy | 'Therebelkid' अपूर्वा मखिजाला ॲसिड ॲटॅक, बलात्काराच्या धमक्या; स्क्रिन शॉट्स केले शेअर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरअपूर्वा मखीजाने 'इंडियाज गॉट लॅटेंट' वादाच्या ठिक दोन महिन्यांनंतर तिचा पहिली पोस्ट शेअर केली आहे, जे पाहून तिच्या फॅन्सना भितीदायक वाटत आहे. या पोस्टमध्ये तिने ती झलक दाखवली आहे, ज्यामध्ये 'इंडियाज गॉट लॅटेंट' शो च्या वादानंतर तिला खूप अर्वाच्च, घाणेरड्या भाषेत धमक्या मिळाल्या आहेत. अपूर्वा मखीजाने पहिली पोस्ट केले असून त्यामध्ये तिने तिच्यावर किती खोल परिणाम झाल्याचे आणि समय रैनाच्या शो कॉमेंट नंतर बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे म्हटले जात आहे.

'इंडियाज गॉट लॅटेंट' वादानंतर अडचणीत अपूर्वा मखीजा

अपूर्वा मखीजा यावर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू झालेल्या 'इंडियाज गॉट लॅटेंट' वादानंतर अडचणीत सापडली होती. हा वाद सुरू होण्याच्या ठिक दोन महिन्यांनंतर मंगळवार, ८ एप्रिलला अपूर्वाने आपले पहिले पोस्ट शेअर केले आहे. पोस्टमध्ये तिने खूप खालच्या दर्जाच्या धमक्यांनी भरलेले कॉमेंटवाले स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

अपूर्वा मखिजाने लिहिलं - आणि हे तर १% देखील नाही

अपूर्वाने लिहिलं, 'आणि हे तर १% देखील नाही.' पोस्टच्या पहिल्या स्लाईडमध्ये लिहिलं, 'ट्रिगर वॉर्निंग : या पोस्टमध्ये ॲसिड ॲटॅक, रेपची आणि जीवे मारण्याची धमकी समाविष्ट आहे.' पुढील १९ स्लाईडमध्ये तिच्याविरोधात द्वेष, शिव्या, घाणेरड्या भाषेत बल्ताकाराच्या आणि जीवे मारण्याच्या शेकडो मेसेज आणि कॉमेंट्स आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT