The Taj Story Teaser out  Instagram
मनोरंजन

The Taj Story Teaser: ‘द ताज स्टोरी’च्या टीजरमुळे खळबळ! विचार करायला भाग पाडणारे परेश रावल यांचे प्रश्न, तुम्ही पाहिलं का?

ताज महलवर परेश रावल यांचा सवाल; 'द ताज स्टोरी'चे टीजर रिलीज

स्वालिया न. शिकलगार

मुंबई - 'द ताज स्टोरी'चा टीजर रिलीज झाला आहे. यामध्ये ताज महल संदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. या चित्रपटात परेश रावल यांच्याशिवाय, अनेक कलाकार आहेत. हा टीजर खास ठरलाय. परेश रावल यांच्या 'द ताज स्टोरी'चा टीजर ताजमहलच्या दृश्यापासून सुरू होतो. टीजरमध्ये परेश रावल ताजमहल समोर बसलेले दिसतात.

टीजरमध्ये काय आहे?

टीजरमध्ये परेश रावल म्हणतात, 'ताजमहल जगातील सर्वात महान स्मारकांपैकी एक आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की, हा एक मकबरा आहे आणि कुणासाठी हे एक मंदिर आहे.' टीजरमध्ये अखेरीस परेश रावल विचारतात... 'तुम्हाला काय वाटतं? काय आहे याची कहाणी?'

टीजरमध्ये दिसली वास्तुकलेची सुंदरता

टीजरमध्ये ताजमहल दाखवण्यासाठी अजान आणि मंदिराची घंटी ऐकू देते. सुंदर सिनेमॅटोग्राफी हे टीजरची वास्तुकला उलगडून दाखवते.

निर्मात्यांनी चित्रपटाच्या कहाणी विषयी अद्याप खुलासा केला नाही. पण, अंदाज लावला जाऊ शकतो की, या चित्रपटात प्रेक्षकांना असा भारतीय इतिहासाचा एक अध्याय दाखवला जाईल, जो वर्षांपासून चर्चेत आहे.

'द ताज स्टोरी' मध्ये परेश रावल, जाकिर हुसैन, अमृता खानविलकर, स्नेहा वाघ आणि नमित दास यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. या चित्रपटाचे दिग्दषर्शक तुषार अमरीश गोयल आहेत.

चित्रपटाचा टीजर पाहून भडकले लोक
'द ताज स्टोरी'चा टीजर पाहून अनेक लोक निर्मात्यावर भडकले आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, "आजकाल काही निर्माते जाणूनबुजून आपल्या फायद्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये भांडणे लावण्याचे प्रयत्न करत आहेत. दु:खाची ही बाब आहे की, लोक या दुष्प्रचारामध्ये अडकत आहेत." आणखी एका युजरने कॉमेंट केलीय की, "या चित्रपटामध्ये ताज महललाही चुकीचे सिद्ध केले जाईल." दुसऱ्या एका युजरचे कॉमेंट आहे की, "ताज महलची कहाणी संपूर्ण जग जाणते. आता हे बदलायला चाललेत." तिसऱ्या युजरने म्हटलंय-"आता होईल नवा वाद."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT