पुढारी ऑनलाईन डेस्क : साउथ अभिनेता नॅचरल स्टार नानी सध्या त्याच्या आगामी बहुप्रतिक्षित 'द पॅराडाईज' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये तो व्यस्त आहे. आज, निर्मात्यांनी 'किल' चित्रपटाने सर्व प्रेक्षकांची मने जिंकणारा राघव जुयाल या चित्रपटात दिसणार असल्याची घोषणा केली आहे.
'द पॅराडाईज' च्या निर्मात्यांनी आज राघव जुयालच्या ३४ व्या वाढदिवशी हा खास व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना आनंद दिला आहे. निर्मात्यांनी एका बीटीएस व्हिडिओसह राघव या चित्रपटात सामील असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. राघवचे पात्र या चित्रपटात गंभीर आहे. या व्हिडिओमध्ये त्याची मेहनत आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येतो.
हा व्हिडिओ पाहून असे दिसते की त्याचे पात्र खूप महत्वाचे असणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'द पॅराडाईज - प्रतिभावान लोकांना शुभेच्छा. राघव जुयालला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अद्वितीय अशा भूमिकेत त्याचे स्वागत आहे.
राघवने 'किल' चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. आता तो 'द पॅराडाईज' मध्ये नानीसोबत दिसणार आहे.'द पॅराडाईज' २६ मार्च २०२६ रोजी तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली, इंग्रजी आणि स्पॅनिश भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाव्यतिरिक्त, शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटातही राघव दिसणार असल्याची चर्चा आहे. 'द पॅराडाईज' या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीकांत ओडेलेन करत आहेत.