The Odyssey Box Office | ‘द ओडिसी’ ने भारतात ६ दिवसांत कमावले 80 कोटी 
मनोरंजन

The Odyssey Box Office | ‘द ओडिसी’ ने भारतात ६ दिवसांत कमावले 80 कोटी

पुढारी वृत्तसेवा

हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘द ओडिसी’ ला भारतात जबरदस्त प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशीच भारतातील कमाई 80.65 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ‘द ओडिसी’ने भारतात आयमॅक्स प्रदर्शनाच्या बाबतीतही मोठी कामगिरी केली आहे.

चित्रपटाने भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या आयमॅक्स ओपनर्सपैकी एक म्हणून नोंद केली असून, त्याने ‘मिशन: इम्पॉसिबल - द फायनल रेकनिंग’ला मागे टाकले आहे. जगभरात नोलनचा एक प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे. त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाची मोठी प्रतिक्षा होती. ग्रीक कवी होमर याच्या ‘द ओडिसी’ या महाकाव्यावर आधारीत हा चित्रपट असून ट्रॉयच्या युद्धानंतर ओडिसियसचा पुन्हा घरी परतण्याचा प्रवास यात दाखवला आहे. चित्रपटात मॅट डेमन मुख्य भूमिकेत असून त्याच्या अदाकारीचे कौतूक होत आहे. क्लायमॅक्सच्या सीनची क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. चित्रपटात टॉम हालँड, ॲने हाथवे, झेंडाया, रॉबर्ट पॅटिन्सन, चार्लिज थेरॉन अशी मोठी स्टारकास्ट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT