मनोरंजन

The Night Manager web series : ‘द नाईट मॅनेजर’चे शूटिंग सुरू

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

अभिनेता आदित्य रॉय कपूर याने त्याचे डिजिटल पदार्पण असलेली वेबसीरिज 'द नाईट मॅनेजर'चे (The Night Manager) शूटिंग सुरू केले आहे. खरेतर सध्या आदित्यच्या हातात अनेक चित्रपट आहेत, तरीही त्याने या सीरिजसाठी वेळ दिलेला आहे. या सीरिजमध्ये आदित्य एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. याच नावाच्या इंग्रजी सीरिजचा हा अधिकृत रिमेक आहे. या सीरिजसाठी आधी हृतिक रोशनचे नाव चर्चेत होते. आदित्यने या थ्रिलर सीरिजच्या शूटिंगलाही सुरुवात केली आहे. एक सीक्रेट एजंट आणि एक शस्त्रांस्त्रांचा डीलर यांच्यातील ही कहाणी आहे. दरम्यान, तमिळ चित्रपट 'थडम'च्या हिंदी रिमेकमध्येही आदित्य रॉय कपूर आहे. याशिवाय 'ओम ः द बॅटल विदीन' या अ‍ॅक्शन थ्रिलरमध्येही आदित्य मुख्य भूमिकेत आहे. ( The Night Manager)

SCROLL FOR NEXT