The Kerala Story 2 trailer released  instagram
मनोरंजन

The Kerala Story 2 Trailer : अंगावर शहारा आणणारा जबरदस्त ट्रेलर, ‘द केरळ स्टोरी २’मध्ये नेमकं काय खास?

The Kerala Story 2 Trailer : अंगावर शहारा आणणारा द केरल स्टोरी २ चा जबरदस्त ट्रेलर, तुम्ही पाहून म्हणाल..

स्वालिया न. शिकलगार

‘द केरळ स्टोरी 2’चा ट्रेलर रिलीज झाला असून तो प्रेक्षकांना अंगावर शहारे आणणारा ठरत आहे. धक्कादायक दृश्ये आणि तीव्र संवादांमुळे पुन्हा एकदा चित्रपट चर्चेत आला आहे.

The Kerala Story 2 Goes Beyond Trailer out now

'द केरल स्टोरी २ : गोज बियॉन्ड' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर आज जारी करण्यात आला आहे. हा चित्रपट जबरदस्ती धर्म परिवर्तन आणि पोक्सो यासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर आधारित आहे. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरलची वेगवेगळी कहाणी दाखवण्यात आले आहे. पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही गंभीर आणि संवेदनशील विषय हाताळला जाणार असल्याचे ट्रेलरमधून दिसून येते.

२०२३ मध्ये एक असा चित्रपट रिलीज झाला, ज्या चित्रपटाची समीक्षक आणि प्रेक्षक वर्गाकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 'द केरल स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाचा आता सीक्वल 'केरल स्टोरी २' येणार आहे

अंगावर शहारे आणणारा ट्रेलर

विपुल अमृतलाल शाह आणि त्यांचे बॅनर 'सनशाइन पिक्चर्स'च्या या चित्रपटाचा ट्रेलरची सुरुवात अंगावर शहारे आणणारा आहे. ट्रेलरची सुरुवात 'अगले २५ सालों में भारत एक इस्लामिक स्टेट में बदल सकता है' या संवादाने होते.

नंतर कहाणी राजस्थानकडे वळते, जिथे एक परिवार पोलिस ठाण्यात पोक्सो (POCSO) तक्रार करण्यासाठी जाते. त्यांचा आरोप असतो की, त्यांच्या १६ वर्षाच्या मुलीचे जबरदस्ती धर्म परिवर्तन करण्यात आले आहे. इथून पुढे सुरु होते वेदनादायी कहाणी..

या चित्रपटात चार वेगवेगळ्या कहाण्या दाखवण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशची कहाणी- जिथे तथाकथित एका हिंदू तरुणीला लग्नाच्या जा‍ळ्यात अडकवले जाते. तिला जबरदस्ती धर्म परिवर्तन करण्यास सांगितले जाते. पुढे केरळची कथा यते-जिथे एक मुस्लिम तरुण हिंदू गर्लफ्रेंड समोर लिव्ह-इन रिलेशनशीपचा प्रस्ताव ठेवतो. मुलगी म्हणते की, ती आपला धर्म बदलणार नाही. तेव्हा परिस्थिती बिघडू लागते. ट्रेलरमध्ये जबरदस्त डायलॉग आणि काही सीन्स असे असतात, जे खूपच भयानक आहे.

चित्रपट कामाख्या नारायण सिंहने दिग्दर्शित केलं आहे. उल्का गुप्ता, अदिती भाटिया, ऐश्वर्या ओझा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २७ फेब्रुवारी, २०२६ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT