केतकी चितळे 
मनोरंजन

केतकी चितळेचा रडत रडत व्हिडिओ व्हायरल; महायुतीवर हल्लाबोल करत संतापली

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असलेली मराठी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केतकीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. केतकी या व्हिडिओमध्ये रडत रडत शिंदे सरकारवर टीका करताना दिसतेय. तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काय म्हटलंय पाहा…

अधिक वाचा-

केतकीने 'तीन चाकी सायकलनी बहुतेक प्रचंड मनावर घेतले आहे की आपण कसे पडून दाखवायचे ते', असे शीर्षक व्हिडिओला देत सोशल मीडियावर तिने पोस्ट केलं आहे. ती म्हणते, "एक धक्कादायक बातमी वाचून मी उठले आहे. त्यामुळे काय बोलावं काहीच कळत नाही. ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिलं नाही. त्यांच्या बळकटीकरणासाठी तुम्ही त्यांना १० कोटी रूपये दिले आहेत. तुम्ही बधीर आहात, की आम्हाला बधीर करून सोडणार आहात? मी नेहमी म्हणत होते, लोकसभेत कोणाला मत द्यायचंय ते ठरलेलं आहे. त्यात काही प्रश्न नव्हता. मला माझा प्रधानमंत्री कोण हवाय हे बघून मत दिलेलं होतं, पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे. हे मी आधीपासून म्हणत होते पण तुम्ही तर आता माझं मत तुम्ही खरं करून दाखवणार आहे."

अधिक वाचा-

राज्यातील ​'वक्फ' मंडळाचे बळकटीकरण करण्यासाठी सरकारने १० कोटींच्या निधीची तरतूद ​केलीय. त्यापैकी २ कोटी रुपये १० जूनला वितरीत केल्याचे शासन आदेश अल्पसंख्यांक विकास विभागाने काढला आहे.

अधिक वाचा- 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT