Pacnahayat Season 4 Screengrab Pudhari
मनोरंजन

Panchayat Season 4 Release Date Time: 'फुलेरा' पंचायत निवडणुकीचा थरार कधी आणि कुठे पाहता येईल?

Panchayat Season 4 Release Date : ही सिरिज आता चौथ्या भागात काय मेजवानी आणणार याची उत्सुकता आतापासूनच वाढू लागली

अमृता चौगुले

Pachayat Season 4 OTT Release Date Time In Marathi

मुंबई : पंचायत या सिरिजचा चौथा सीझन येऊ घातला आहे. गेले तीन सीझन धुमाकूळ घालणारी ही सिरिज आता चौथ्या भागात काय मेजवानी आणणार याची उत्सुकता आतापासूनच वाढू लागली आहे. पंचायतचे हार्ड कोर फॅन्स तर कधीपासून या सिरिजच्या प्रतीक्षेत आहेत.

जितेंद्र कुमारचा सोशीक सचिव, नीना गुप्ताने साकारलेली काहीशी शिष्ट प्रधान आणि सच्चे मित्र म्हणून विकास आणि प्रल्हाद आणि चेरी ऑन टॉप रिंकी या सगळ्यांनी ही सिरिज सजवली आहे.

पंचायत सीझन 4ची रिलीज डेट आणि टाईम काय आहे? (Pachayat Season 4 Where To Watch)

पंचायत 24 जूनला रात्री 12 वाजता Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे. या सीझनमध्ये जवळपास 8 एपिसोडस आहेत. या सीझनमध्ये फुलेराचे वातावरण अधिक तापलेले आहे. याला कारण आहे क्रांति देवी आणि मंजू देवी यांचा संघर्ष. पंचायत निवडणुकीसाठी समोरासमोर असलेल्या या दोघी आणि त्याच्यामध्ये अडकलेले सचिवजी यांचे पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ यांची सर्कस दिसणार आहे.

ही आहे पंचायत सीझन 4 ची कास्ट

जितेंद्र कुमार (अभिषेक त्रिपाठी), नीना गुप्ता (मंजू देवी), रघुबीर यादव (प्रधानजी ), चंदन रॉय (विकास), फैसल मलीक (प्रल्हाद ), सानविका ( रिंकी), दुर्गेश कुमार (भूषण शर्मा), सुनीता राजवर (क्रांति देवी) ही तगडी कास्ट पुन्हा एकदा मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. आता क्रांति देवी आणि मंजू देवी यांच्यातील लढत कोण जिंकणार याची उत्सुकता सिरिज प्रत्यक्ष पाहिल्यावरच कमी होईल. फुलेरातील निवडणुकीच्या धामधुमीत सचिव जी आणि रिंकी यांच्या लव स्टोरीचे नेमके काय होते याची देखील उत्सुकता या सीजनने वाढवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT