ओटीटीवरील लोकप्रिय फ्रँचाईजीपैकी एक म्हणजे फॅमिली मॅन. मनोज वाजपेयी, प्रियमणी, शरीब हाशमी यांच्या अभिनयाने नटलेली ही सिरिज प्रेक्षकांची आवडती आहे. या फ्रँचाईजीचा तिसरा सीझन येऊ घातला आहे. हा सीझन कधी रिलीज होणार याची वाट प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तर आता ही रिलीज डेट मेकर्सनी समोर आणली आहे. सोबत असेलल्या प्रोमोमध्ये मनोज वाजपेयी हटके अंदाजात दिसत आहेत. (Latest Entertainment News)
मंगळवारी मेकर्सने या सिरिजच्या रिलीजची घोषणा केली आहे. या प्रोमोमध्ये प्रियमणी मागील चार वर्षांच्या आठवणी सांगताना दिसत आहे. ज्यामध्ये त्यांची मुलगी कॉलेजमध्ये जाताना दिसते. तर मुलगा बॅले डान्स शिकत असल्याचेही सांगते. यानंतर फ्रेममध्ये मनोज वाजपेयी दिसतो. जो सगळी कडे 'आ..’ अशी धुन गुणगुणताना दिसतो. सगळे त्याला हाच प्रश्न विचारतात, असे का करत आहेस? याचे उत्तर मनोज वाजपेयी व्हीडियोच्या शेवटी देताना दिसतात. यात सांगितले गेले आहे की 21 नोव्हेंबरला ही सिरिज रिलीज होणार आहे.
या सिरीजमध्ये जयदीप अहलावत आणि निमरत कौर व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहेत. यावेळी मागील दोन सीझन पेक्षाही चित्तथरारक प्लॉट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जो यावेळी श्रीकांतच्या करियर आणि कुटुंबावरही संक्रांत आणणार आहे.
अभिनेत्री आश्लेषा ठाकुर (धृति तिवारी), वेदांत सिन्हा (अथर्व तिवारी), श्रेया धनवंतरी (झोया) आणि गुल पनाग (सलोनी) हे कलाकारही या सिरिजमध्ये परत दिसणार आहेत.