पुढारी ऑनलाईन
माधुरी दीक्षितची वेबसीरीज 'द फेम गेम'चा ट्रेलर रीलीज झाला आहे. माधुरीनेच सोशल मीडियातून ही माहिती दिली आहे. बिजॉय नांबियार आणि करिष्मा कोहली यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. तर करन जोहरने या सीरिजची निर्मिती केली आहे.
नेटफ्लिक्सवर 25 फेब्रुवारीपासून ही सीरीज स्ट्रीम होणार आहे. माधुरीने यात अनामिका आनंद ही भूमिका साकारली आहे. ती हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री असते. सीरिजमध्ये संजय कपूर, मानव कौल, सुहासिनी मुळे आणि मुस्कान जाफरी यांच्या भूमिका आहेत.