Oscar 2023
हत्ती आणि मानवाच्‍या नात्‍याची गोष्ट सांगणारा The Elephant Whisperers Oscar 2023
मनोरंजन

Oscar 2023 : हत्ती आणि मानवाच्‍या नात्‍याची गोष्ट सांगणारा The Elephant Whisperers

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्कर पुरस्‍काराचे वितरण लॉस एंजिलिसमध्ये झाले. या सोहळ्यात भारतीय लघुपट 'द एलिफंट व्हिस्परर्स' (The Elephant Whisperers ) ने ऑस्‍कर पुरस्‍कारावर आपली मोहर उमटवली. बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार या लघूपटाला मिळाला आहे.या शॉर्ट फिल्मच्या निर्मात्या गुनीत मोंगा यांनी तर दिग्दर्शक कार्तिकी गोंझालवेस आहेत. जाणून घेवूया हत्ती आणि मानवामधल्या नात्याची गोष्ट सांगणारा 'द एलिफंट व्हिस्परर्स' बद्दल.

हत्ती आणि त्याची काळजी घेणारं एक दाम्पत्य यांच्या अतुट नात्याचे बंध 'द एलिफंट व्हिस्परर्स' या नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरीमध्‍ये दाखविण्‍यात आला आहे. 'हाऊ डू यू मेजर अ इयर?' ,'हॉलआउट', 'स्ट्रेंजर ॲट द गेट' आणि 'द मार्था मिशेल इफेक्ट' या लघुपटांना मागे टाकत 'द एलिफंट व्हिस्परर्स'ने बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कारावर आपली मोहर उमटवली.

The Elephant Whisperers : हत्ती आणि मानवाचे नाते

'द एलिफंट व्हिस्परर्स' हा लघूपट हत्ती आणि त्यांची काळजी घेणाऱ्या बमन आणि बेला या दाम्पत्यावर आधारित आहे. लघूपटाची कथा ही हत्ती आणि त्याच्या मालकाशी असलेल्या प्रेमावर असून, निसर्गाशी जोडताना दिसत आहे. लघूपटात दोघांमध्ये असलेल्या भावनिक नात्यावर भाष्य करण्यात आलं आहे. ते लोक आपल्या हत्तींशी कस खेळतात, दंगामस्ती करतात, त्याचबरोबर त्या मालकाची पत्नीही यात हत्तींशी खेळताना संवाद करताना दिसत आहे. हत्ती आणि बमन आणि बेला यांच भावनिक नात्याचं चित्रीकरण दाखवण्यात आलं आहे. हा भावनिक बंध प्रेक्षकांना प्रभावित करतो.

माहितीपटाच्या कथेची सुरुवात निसर्गरम्य दृश्यांनी होते, त्यानंतर बोमन आपला हत्ती रघूला आंघोळीसाठी नदीवर घेऊन जातो. या चित्रपटात बोमन आणि हत्ती रघू यांच्यातील नाते दाखवण्यात आले आहे. बामन सांगतो की, त्याला जंगलात रघू जखमी अवस्थेत आढळला. तो जमिनीवर बेशुद्ध पडला होता. रघूची त्याच्या कळपाशी ओळख करून देण्याचा खूप प्रयत्न केला जातो; पण सर्व प्रयत्न अयशस्वी होतात.

यादरम्यान, बोमनने बेलाची निवड हत्तींच्या बाळाची काळजी घेण्यासाठी केली गेली होती. ती एकमेव महिला आहे जी हत्तींची काळजी घेणारी होती. या लघुपटात प्राणी आणि हत्तींवरील प्रेम, त्या हत्तींना सोडून दिल्यावर आणि त्यांच्या कळपापासून वेगळे झाल्यानंतर त्यांची कशी काळजी घेतली जाते हे दाखवण्यात आले आहे. रघु आणि अम्मू यांना ओळखण्यासाठी आणि त्यांचे निरीक्षण करण्यासाठी गळ्यात घंटा घातली आहे. जेणेकरून ते जंगलात कुठेतरी हरवले तर सहज सापडतील. रघूचा एक मित्रही आहे, त्याचे नाव कृष्ण आहे. कृष्णा आणि रघु संपूर्ण वेळ मजा करतात आणि दोघेही एकमेकांना साथ देतात.

या चित्रपटाची संपूर्ण कथा हत्तींभोवती फिरते. बामन आणि रघू यांच्यातील एक सुंदर बंध दाखवला आहे. दरम्यान, जंगलात आग देखील लागते, ज्यामध्ये जवळपास सर्व हत्तींचा मृत्यू झाला आणि एक लहान हत्तीण वाचते. ज्यांना बोमन आणि बेला दत्तक घेतात आणि त्यांची काळजी घेतात. जोडप्याचा सगळा वेळ त्यांच्या संगोपन करण्यात जातो. रघू आणि हत्तीचे मुल अम्मू यांच्यातील बंधही घट्ट होत जातो. दरम्यान, बोमन आणि बेलीचेही लग्न होते. नंतर रघूला दुसऱ्याच्या हवाली केले जाते, त्यामुळे अम्मू बराच काळ उदास राहतो. त्यानंतर, ती हळूहळू बरी होते आणि जोडपे अम्मूची काळजी घेण्यास परत येते.

The Elephant Whisperers : आजची रात्र ऐतिहासिक-गुनीत मोंगा

'द एलिफंट व्हिस्परर्स' (The Elephant Whisperers) निर्मात्या यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटल आहे की,"आजची रात्र ऐतिहासिक आहे. कारण भारतीय निर्मितीसाठी हा पहिलाच ऑस्कर आहे. दोन महिलांसह भारताचा गौरव होत आहे. पुढे पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे आई-बाबा, गुरुजी, सह-निर्माता अचिन जैन, टीम सिख्या, नेटफ्लिक्स, अलोके, सराफिना, WME बॅश संजना. नवरा सनी, कार्तिकी यांचे आभार मानले आहे. जय हिंद!

तर ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, गुनीत मोंगा यांनी एक ट्वीटही केलं आहे. "आम्‍ही आत्ताच भारतीय प्रॉडक्‍शनसाठी पहिला ऑस्कर जिंकला! दोन महिलांनी हे करून दाखवलंय! मी अजूनही थरथरत आहे.

SCROLL FOR NEXT