सलमान खानने नुकतीच सितारे जमीन परच्या प्रीमियरला हजेरी लावली होती. यावेळी सगळेच गप्पांमध्ये रमले असताना एक किस्सा घडला. सलमान सगळ्याना भेटत असताना एक लहान मुलगा त्याच्याकडे येतो. हे पाहताच सलमानचा बॉडीगार्ड त्याला बाजूला ढकलतो. हे पाहताच सलमानने बॉडीगार्डकडे रागाचा एक कटाक्ष टाकला आणि त्याला Dont do it (असे करू नको) असा हाताने इशारा केला.
या घटनेचा व्हीडियो व्हायरल होताच संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत
सलमानला सध्या बिश्नोई गॅंगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याच्या घराच्या आसपास हल्लेखोरांनी रेकी केल्याचे समजताच खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्याच्या आसपास सतत सुरक्षा रक्षकांचा गराडा असतो. पण या व्हीडियोमध्ये सगळे सलमानच्या कृतीचे कौतूक करत आहेत.
यानंतर सलमान आणि आमीरमध्ये खुसखुशीत संवादही रंगला होता. सलमानने सितारे जमीन पर वरुण आमीरची चांगलीच खेचली. सलमान म्हणतो, आमीरने मला या सिनेमाची स्टोरी सांगितली नाही पण एका चांगल्या विषयावर हा सिनेमा बेतला असल्याचे सांगितले. मला या विषय आवडला. मी हा सिनेमा करण्यास तयारही झालो. पण नंतर काही दिवसांनी आमीरचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की तो हा सिनेमा करतो आहे. मी बहुतेक सिनेमाची इतक कौतूक केले की आमीरने स्वत:च तो सिनेमा करायचे ठरवले.
आमीरचा सितारे जमीन परचा प्रीमियर सिनेसृष्टिच्या सिताऱ्यांनी गजबजलेला होता. जिनीलिया देशमुख, रितेश देशमुख, रेखा, नूपुर शिखरे, आयरा खान, शाहरुख खान हे सेलिब्रिटी यावेळी हजर होते. यावेळी आमीर आणि गर्लफ्रेंड गौरी स्प्रात हातात हात घालून दिसून आले. तर शेजारी मुलगा आझाद होता.
धमकीमुळे सलमान सतत बॉडीगार्डच्या गराड्यात असतो. त्यामुळे तो सलमान जवळ येऊ लागताच. जुनैदला ही बाजूला सरकवले. सलमान बॉडीगार्डसह आल्यावर त्याच्या बॉडीगार्डनी जुनैदला ओळखले नाही. आणि त्याला रस्त्यातून बाजूला व्हायला सांगितले.