नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) चित्रपटांसह सोशल मीडियावरही कायम चर्चेत असते. ती आपल्या चाहत्यांमध्ये तिच्या इव्हेंटची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करते. सनी लिओनीचा आगामी चित्रपट 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' (The Battle of Bhima Koregaon) येत आहे. तिने या चित्रपटातील एक गाणे इंस्टाग्रामवर शेअर केले आहे, जे जोरात चर्चेत आहे. या गाण्यात सनी लिओनी 'मराठी मुलगी' लूकमध्ये दिसली आहे. सनी लिओनीचे हे गाणे चाहत्यांना खूप भावल्याचे दिसून येत आहे.
सनी लिओनीवर चित्रित केलेले हे गाणे प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाले गायले आहे. गाण्यात सनी लिओनी खूपच सुंदर दिसत असून तिचा डान्सही अप्रतिम आहे. गाणे शेअर केल्यानंतर तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'हो आली रे आली … मराठी मुलगी आली'. सनी लिओनीचे हे गाणे इंस्टाग्रामवर अल्पावधीत दीड लाखाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. गाण्यात सनी लिओनीच्या लूक आणि एक्सप्रेशन्सचे चाहते कौतुक करत आहेत.
या चित्रपटात सनी लिओन व्यतिरिक्त अर्जुन रामपाल, दिगंगना सूर्यवंशी आणि कृष्णा अभिषेक हे 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाशिवाय सनी लिओन लवकरच आगामी 'कोका कोला', 'रंगीला' आणि 'वीरमादेवी' या चित्रपटात दिसणार आहे. बिग बॉसमध्ये आल्यानंतर सनी लिओनीची लोकप्रियता वाढतच गेली आहे. या व्यतिरिक्त तिने आपल्या 'रईस' चित्रपटातील लैला सॉन्गमधूनही चांगलीच हवा केली होती.