पुढारी ऑनलाईन डेस्क - स्टार प्रवाहची ठरलं तर मग मालिका सध्या अतिशय रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. अर्जुनने सर्वांदेखत सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिलीय. मात्र मधुभाऊंना दिलेल्या वचनाखातर सायली आपल्या मनातील भावना व्यक्त करु शकली नाही. सायली अर्जुनसमोर तिच्या मनातलं प्रेम व्यक्त करणार आहे. मालिकेतलं हे सर्वात मोठं वळण आहे.
कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य उघड झाल्यानंतर सुभेदार कुटुंबाने आपली तीव्र नाराजी व्यक्त करुन सायलीला घराबाहेर काढलं. अर्जुनलाही अद्याप त्याच्या कुटुंबियांनी माफ केलेलं नाही. तिकडे मधुभाऊंच्या मनातही अर्जुनविषयी बरेच गैरसमज आहेत. अश्या परिस्थितीत अर्जुन-सायली कसे एकत्र येणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ठरलं तर मग रात्री ८.३० वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.