थलपती विजय यांच्या 'जन नायकन'ने बॉक्स ऑफिसवर दमदार वेग कायम ठेवला आहे. रिलीज झाल्यानंतर केवळ तीन दिवसांत चित्रपटाने जगभरात २०० कोटी रुपयांच्या टप्प्याकडे झेप घेतली असून, देशांतर्गत आणि परदेशातील कमाईमुळे हा चित्रपट वर्षातील मोठ्या ब्लॉकबस्टरपैकी एक ठरत आहे.
Thalapthy Vijay Film All Set To Cross Rs 200 Crore Mark Worldwide
साऊथ सुपरस्टार थलपती विजय यांचा शेवटचा चित्रपट 'जन नायगन'ने बॉक्स ऑफिसवरच नाही तर ग्लोबलीही कमाईचा धुव्वा उडवलाय. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली, पाहुया.
जगभरात २०० कोटींचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर
विजयच्या 'जन नायकन' या चित्रपटाने रिलीजनंतर पहिल्या आठवड्याच्या शेवटी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. गुरुवारी चित्रपटाने चांगली सुरुवात केली. पण दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कमाईची गती थोडी हळूवार झाली.
पण तिसऱ्या दिवशी मात्र कमाईने जोर पकडला आणि कमाईत वाढ झाली. ट्रेड ट्रॅकरच्या माहितीनुसार, 'जन नायकन'ने तिसऱ्या दिवशी भारतात अंदाजे २८.५० कोटी रुपयांची नेट कमाई केली.
भारतातील कमाई -
तिसऱ्या दिवशी - अंदाजे २८.५०
पहिल्या दिवशी - ४२.७ कोटी रुपये
दुसऱ्या दिवशी- २१.१५ कोटी रुपये
तिसऱ्या दिवशी - अंदाजे २८.५०
भारतातील तीन दिवसांची नेट कमाई - ७४.४४ कोटी रुपये
भारतातील एकूण कमाई - ८७.५० कोटी रुपये
जगभरातील आतापर्यंतची एकूण कमाई - १७१.८४ कोटी रुपये
या चित्रपटाची क्रेझ चेन्नईमध्ये सर्वात मोठी ठरली. त्यानंतर बंगळुरू दुसरे केंद्र ठरले. रविवारी रात्रीपर्यंत 'जन नायकन'ने १२,०८० शो सादर झाले. त्यातून ३१.९७ कोटी रुपयांची कमाई केली.
दिग्दर्शन एच. विनोद, निर्मिती केव्हीएन प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने व्यंकट के. नारायण यांनी केली आहे. विजय यांच्या शिवाय, पूजा हेगडे, ममिता प्रकाश राज, बैजू, नासर, गौतम वासुदेव मेनन, प्रियामणी, नारायण यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.