डबल रोल असणाऱ्या थलपती विजयच्या 'गोट'चा ट्रेलर रिलीज  GOAT Trailer
मनोरंजन

GOAT Trailer : डबल रोल असणाऱ्या थलपती विजयच्या 'गोट'चा ट्रेलर रिलीज

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : लिओ चित्रपटानंतर साऊथ स्टार थलपती विजय च्याच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी आगामी 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' (GOAT) या चित्रपट ५ सप्टेंबर रोजी चाहत्यांच्या भेटीस येत आहे. यामुळे आतापासून या चित्रपटाचे ॲडव्हास बुकिंगला सुरूवात झाला. याच दरम्यान 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' (GOAT) या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलर पाहून चित्रपटासाठी चाहत्यांची आतुरता शिगेला पोहोचली आहे. ( The Greatest of All Time )

अभिनेता थलपती विजयचा आगामी 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' (GOAT) या चित्रपटाचा धमाकदार ट्रेलर युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर धमाकेदार ॲक्शन सीनने भरलेला आहे. चित्रपटात विजयच्या भूमिकेचे नाव गांधी आहे. विजयच्या गरोदर पत्नीला शंका आहे की, त्याचे दुसरीकडे कुठेतरी अफेअर आहे. असे दाखविले आहे. चित्रपटातील विजयचे पोस्टर रिलीज झाल्यापासून चाहते आतुरतेने वाट पाहत होते. याच दरम्यान चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग एक महिना आधीच सुरू झाले आहे. मात्र, हे ॲडव्हान्स बुकिंग देशात नसून यूके (युनायटेड किंगडम) मध्ये सुरू झाले आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज होताच कलाकरांसह चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतुक केलं आहे.

थलपती विजयसोबत या चित्रपटात मीनाक्षी चौधरी, जयराम, स्नेहा, लैला, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश, अजमल अमीर, मनोबाला, वैभव, प्रेमगी, अजय राज आणि अरविंद आकाश यांसारखे कलाकार दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन व्यंकट प्रभू यांनी केलं आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२४ रोजी रिलीज होणार आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, थलपती विजय शेवटचा 'लिओ' चित्रपटात दिसला होता. यामध्ये संजय दत्त आणि त्रिशा कृष्णन हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि नेटफ्लिक्सवरही त्याची चर्चा रंगली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT