'तेरे इश्क में' चित्रपटातील अभिनेत्याचा लुक व्हायरल झाला आहे.  image source X
मनोरंजन

Tere Ishq Mein : फोटो पाहून 'या' दाक्षिणात्य अभिनेत्याला तुम्ही ओळखणारच नाही !

New movie viral photo : प्रदर्शनाआधीच फोटो झाला व्हायरल

Asit Banage

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता धनुष हा चित्रपटसृष्टीतील एक गुणी अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने 'रांझना' (२०१३) आणि 'अतरंगी रे' (२०२१) यासारख्या अनेक चित्रपटांतून त्याची अभिनय क्षमता सिद्ध केली आहे.

आता धनुषचा आगामी चित्रपट 'तेरे इश्क में' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील धनुषचा लुक सध्या व्हायरल होत आहे. हा व्हायरल फोटो पाहिला तर कोणाचाही विश्वास बसणार नाही की या फोटोतील अभिनेता खुद्द धनुषच आहे. अभिनेता धनुष सध्या दिल्लीतील श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) येथे त्याच्या आगामी 'तेरे इश्क में' चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या चित्रपटाच्या सेटवरून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या बाबतचे वृत्त अमर उजालाने दिले आहे. व्हिडिओमध्ये, धनुष कॉलेजमध्ये अॅक्शन सीन शूट करताना दिसत आहे. येथील विद्यार्थी धनुषची एक झलक पाहण्यासाठी रांगा लावत आहेत.

चित्रपटातील धनुषचा खास लूक समोर

विद्यार्थ्यांनी अभिनेत्याच्या अभिनयाची झलक टिपल्याने कॅम्पसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. धनुष कॉलेजमध्ये धावताना दिसत असल्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन समोर आले आहेत, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी शेअर केलेल्या लीक झालेल्या फुटेजमध्ये चित्रपटाच्या शूटिंगमधील पडद्यामागील फुटेज दाखवले आहे. एका व्हायरल फोटोमध्ये धनुष गर्दीतून पळत असताना अतिरिक्त कर्मचारी त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. या व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये धनुषचा नवा लूकही दिसून आला.

कृती सॅनन करणार धनुषसोबत स्क्रीन शेअर

धनुषचा 'रांझना' (२०१३) आणि 'अतरंगी रे' (२०२१) नंतर आनंद एल. राय सोबतचा हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात कृती धनुषच्या प्रेयसीची भुमिका साकारताना दिसणार आहे. या प्रोजेक्टची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. आता कृती सॅनन चित्रपटात सामील झाल्याने तर ही उत्सुकता आणखी वाढली आहे. २८ जानेवारी रोजी, निर्मात्यांनी चित्रपटात कृती सॅननचा समावेश असल्याचे जाहीर केले. 'तेरे इश्क में' हा चित्रपट २८ नोव्हेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT