मनोरंजन

अरे बापरे! कमाईत तेलगू इंडस्ट्रीने बॉलीवूडला टाकले मागे!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचा डंका बॉलीवूडसह देशभरात आणि जगभरात वाजत आहे. अनेक मोठ्या बॉलीवूड कलाकारांचे चित्रपट अपयशी ठरत असताना दाक्षिणात्य चित्रपटांची कमाई मात्र अचंबित करून टाकत आहे. एकंदरीत दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉलीवूडला मागे टाकले आहे. एका अहवालानुसार पूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांचा कमाईतील वाटा 36 टक्के असायचा. आता तो 59 टक्क्यांच्या वर गेला आहे. 2019 पर्यंत बॉलीवूडची कमाई एकूण कमाईच्या 44 टक्क्यांपर्यंत असायची. ती गतवर्षी 27 टक्क्यांवर घसरली आहे.

हॉलीवूडची कमाई 15 टक्क्यांवरून 11 टक्क्यांवर घसरली आहे. तमिळ, तेलगू, कन्‍नड आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांनी हिंदी चित्रपटांनाच नव्हे तर हॉलीवूडलाही बॉक्स ऑफिसवर पाठीमागे टाकले आहे. यातली तेलगू चित्रपट इंडस्ट्रीचा वाटा 28 टक्के इतका आहे. म्हणजेच एकट्या तेलगू चित्रपट इंडस्ट्रीने बॉलीवूडपेक्षा एक टक्‍का जास्त कमाई केली आहे. गत दोन वर्षांत सर्वाधिक कमाई करणार्‍या टॉप टेन चित्रपटांमध्ये चार चित्रपट तेलगू आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT