बॉलीवूड अभिनेत्री तारा सुतारियाने तिच्या नवीन फोटोशूटमधील ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. तिच्या या लूकचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले. मात्र, सर्वांचं लक्ष वेधून घेतलं तिचा कथित एक्स-बॉयफ्रेंड वीर पहारियाने या पोस्टला दिलेला ‘लाईक’ने. या महिन्याच्या सुरुवातीला तारा आणि वीर यांच्या ब्रेकअपच्या बातम्या व्हायरल झाल्या. या चर्चांना आणखी हवा मिळाली ती ए. पी. ढिल्लनच्या मुंबईतील कॉन्सर्टनंतर. जिथे त्याने ताराला मिठी मारून किस केल्याचा व्हिडीओ आणि फोटो समोर आले.
त्यानंतर वीरने 1 फेब्रुवारीला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. या पार्टीला भूमी पेडणेकर, रिया चक्रवर्ती, न्यासा देवगण असे अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. मात्र, यात तारा दिसली नाही. ज्यामुळे ब्रेकअपच्या चर्चांना अधिकच बळ मिळालं. ताराने ऑगस्ट 2025 मध्ये वीरसोबतचं नातं इन्स्टाग्रामवर अधिकृत केलं होतं. मात्र, सध्या दोघेही या नात्याबाबत थेट प्रतिक्रिया देत नसल्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम कायम आहे. तारा लवकरच ‘टॉक्सिक’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात यश मुख्य भूमिकेत असून, कियारा अडवाणी, नयनतारा, हुमा कुरेशी आणि रुक्मिणी वसंत हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.