Tannaz Irani  
मनोरंजन

Tannaz Irani : तनाज इराणीचा प्रेरणादायी प्रवास

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : तनाज इरानीने ( Tannaz Irani ) बॉलीवूडसह छोटया पडद्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. हिंदी मालिकांमुळेच ती नावारूपाला आली, पण तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत कायमच चर्चा रंगल्या. अगदी कमी वयामध्ये तनाजने फरीदबरोबर पहिले लग्न केले. २० व्या वर्षी तिने मुलीला जन्म दिला; मात्र तिचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. तनाज व फरीदचा घटस्फोट झाला. तिची मुलगी फरीदबरोबरच राहू लागली.

घटस्फोटानंतर मात्र तनाजने ( Tannaz Irani ) हिंदी मालिकांमध्ये काम सुरू केले. तिने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. हिंदी मालिकांमध्ये काम करत असताना ती अभिनेता बख्तयार इरानीच्या प्रेमात पडली. तनाज बख्तयारपेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे बख्तयारच्या कुटुंबीयांचा १६ मार्च २००७ मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले. आता तनाज व बख्तयार सुखाचा संसार करत आहेत. तनाज व बख्तयारला दोन मुले आहेत. तनाजने दूसरे लग्न केल्यानंतर अभिनयक्षेत्रातही नशीब आजमावले. मालिकांमुळे ती घराघरांत पोहोचली.

शनिवारी तनाजचा वाढदिवस होता. चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या. खरे तर वैवाहिक आयुष्यात अपयश आले की अनेकजणी प्रवाहातून बाहेर पडतात. पण तनाजचा संघर्षमय जीवन प्रवास प्रेरणा देणारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT