मनोरंजन

मुरलीधरनची भूमिका साकारणार ‘हा’ सुपरस्टार   

Pudhari News

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

बॉलिवूडमध्ये नेहमीच एखाद्याच्या जीवनावर आधारित बायोपिकचे वारे वाहत असते. बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिथाली राजवर बायोपिक लवकरच येत आहे. याचदरम्यान श्रीलंकेचा दिग्गज स्पिनर मुथैया मुरलीधरन यांच्या जीवनावर आधारित बायोपिक बनविण्यात येणार आहे. या बायोपिकमध्ये मुथैया मुरलीधरन यांची भूमिका तमिळ सुपरस्टार विजय सेतुपती साकारणार आहे. याबाबतची माहिती विजय सेतुपती यांनी आपल्या टविटरवरून दिली आहे. 

विजय सेतुपतीने आपल्या ट्विटरवर एक फोटो शेअर करून लिहिले आहे की, 'मी या शानदार प्रोजेक्टचा भाग होऊन स्वत:ला नशीबवान समजतो आहे. या बायोपिकबाबत लवकरच अधिकृत माहिती समोर येईल.'

याआधी लिजेंड स्पिनर मुथैया मुरलीधरनच्या बायोपिकचे नाव '८००' असे असल्याचे वृत्त समोर आले होते. याचे कारण मुरलीधरनने टेस्ट क्रिकेटमध्ये ८०० विकेट घेतल्या होत्या. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड होता. या रेकॉर्डच्या जवळपास ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न याने ७०८ विकेट घेतल्या होत्या. या सिनेमाचं दिग्दर्शन एम एस श्रीपथी हे करणार आहेत. विजय सेतुपती ही भूमिका साकारण्यासाठी मुथैया मुरलीधरन याच्यांकडून क्रिकेटचं ट्रेनिंग घेत आहेत. 

विजय सेतुपतीने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, 'मुथैया मुरलीधरनच्या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. मुलरीधरनची भूमिका साकारणे माझ्यासाठी एक चॅलेंज आहे. मी ही भूमिका साकरण्याची वाट पाहत होतो'.

अधिक वाचा 

विकी कौशल वाढविणार तब्बल १०० किलो वजन! 

'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर पाहून लक्ष्मी नारायण त्रिपाठी म्हणाल्या… (video) 

(photo : VijaySethupathi twitter वरून साभार)

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT