Tamil Nadu CM Rejected Karuppu Movie 
मनोरंजन

Tamil Nadu CM Rejected Karuppu Movie| त्रिशा कृष्णनमुळे थलपति विजयनी सोडला 'करुप्पू'? अखेर सूर्याला कसा मिळाला चित्रपट?

साऊथ चित्रपट 'करुप्पू'साठी सूर्या नाही तर 'हा' सुपरस्टार होता पहिली पसंती!

स्वालिया न. शिकलगार

सूर्या आणि त्रिशा कृष्णन स्टारर ‘करुप्पू’ चित्रपटाबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट सुरुवातीला एका लोकप्रिय अभिनेत्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र नंतर हा प्रोजेक्ट सूर्याकडे गेला. यावर दिग्दर्शक आर जे बालाजी यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर चाहत्यांमध्ये पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

karuppu movie thalapathy vijay trisha krishnan suriya rj balaji

साऊथचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'करुप्पू'बाबत मोठा खुलासा झाला आहे. या चित्रपटासाठी दिग्दर्शकाची पहिली पसंती सूर्या नसून एक लोकप्रिय अभिनेता, जो आता राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. मात्र, त्या अभिनेत्याने त्रिशा कृष्णनसोबतच्या काही कारणांमुळे या चित्रपटाला नकार दिल्याचे म्हटले जात आहे. करुप्पू या चित्रपटात त्रिशा मुख्य भूमिकेत असून या अभिनेत्यानंतर साऊथ स्टार सूर्याला मुख्य भूमिकेत घेण्यात आले.

'करुप्पू' चित्रपटाचे गुपित

सूर्या आणि त्रिशा कृष्णन यांचा 'करुप्पू' चित्रपट सध्या जगभरात २६७ कोटींची कमाई करून चर्चेत आहे. परंतु, दिग्दर्शक आर.जे. बालाजी यांनी नुकताच एक रंजक खुलासा केला आहे. त्यांच्या मते, या चित्रपटासाठी सूर्या नव्हे तर थलपती विजय यांची पहिली निवड करण्यात आली होती.

राजकारणात पूर्णवेळ प्रवेश करण्यापूर्वी हा विजयचा शेवटचा चित्रपट असावा अशी बालाजी यांची इच्छा होती. विजयने दोन-तीन वेळा कथा ऐकली, पण शेवटी त्यांनी दुसऱ्या प्रकल्पाला पसंती दिली. बालाजी म्हणाले, "विजय सरांनी काही 'वाजवी' कारणांमुळे नकार दिला, ज्याचा मी आदर करतो." विजयच्या काही प्रश्नांमुळे कथेला अधिक पैलू मिळाले, म्हणूनच चित्रपटाच्या सुरुवातीला त्यांचे आभार मानले गेले. विजयने नकार दिल्यावर ही कथा सूर्याला ऐकवण्यात आली आणि आज हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे.

एका मुलाखतीत बालाजी म्हणाले की, "हा विजयचा शेवटचा चित्रपट असणार होता. त्यामुळे आमच्या दोन-तीन मीटिंग झाल्या, ज्या बऱ्याच वेळ चालल्या. या बैठकांमध्ये त्याच्या राजकारण प्रवेशासारख्या विषयांवर आणि 'शेवटचा चित्रपट' म्हणून नक्की कोणता चित्रपट करायचा, यावर निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली."

जेव्हा विजयने या चित्रपटातून माघार घेतली, तेव्हा त्याच्या या निर्णयाचा मी आदर केला. "मला वाटले की, त्याची कारणे रास्त होती. मी त्याला म्हणालो, 'सर, मी तुमच्या निर्णयाचा पूर्णपणे आदर करतो; तुमचे खूप खूप आभार.' कारण, त्या वेळेपर्यंत मी त्याला दोन चित्रपटांच्या कथा ऐकवल्या होत्या. जेव्हा त्याने मला विचारले की, माझ्याकडे काही (कथा) तयार आहे का. मला वाटले की, माझ्या कामाचा आणि माझ्या सर्जनशीलतेचा त्याने केलेला हा एक मोठा सन्मानच होता."

सूर्या आणि त्रिशा कृष्णन यांच्या व्यतिरिक्त, 'करुप्पू' या चित्रपटात इंद्रन्स, नॅटी सुब्रमण्यम, स्वासिका, शिवदा, अनघा माया रवी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच इतर कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT