मनोरंजन

tamannah : तमन्नाचे नवे प्रेम

स्वालिया न. शिकलगार

बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गोव्यातील नवीन वर्षाच्या पार्टीत तमन्नाला एका बॉलीवूड अभिनेत्याशी लिपलॉक करताना पाहिले गेले. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा या जोडीला मुंबईतील एका कार्यक्रमात एकत्र पाहिले गेले आहे. आलिया भट्टच्या डार्लिंग्स या चित्रपटातील मुख्य अभिनेता विजय वर्मा आहे. एका पुरस्कार सोहळ्यात विजय आणि तमन्नाला पुन्हा एकदा एकत्र पाहिले गेले. तमन्ना आणि विजय ही सध्या इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी बनली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आधी तमन्ना एकटीच हातात ट्रॉफी घेऊन फोटोसाठी पोझ देत असते. तेव्हा विजय वर्मा अचानक फ—ेममध्ये येतो, कारण तो तिच्या मागून चालत असतो. मात्र तो थांबून तमन्नासोबत फोटोसाठी पोझ देतो. चाहत्यांना या दोघांची केमिस्ट्री खूपच आवडली आहे. तर काहींनी या जोडीबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT