तमन्ना भाटिया ही तिचे चित्रपट आणि अदाकारीपेक्षाही तिच्या आयटम साँग आणि तिच्या फिगरमुळे चर्चेत असते. तिच्या शरीरावरील कर्व्हची चर्चा तर बी-टाऊनमध्ये नेहमीच होते. दरम्यान, तमन्नाच्या शरीरातील बदलाने लोकांचे लक्ष वेधले आहे.
त्यावरून सोशल मीडियात चर्चा सुरू होत्या की, तमन्नादेखील वजन कमी करण्यासाठी ओझेम्पिक आणि माऊंटजारो ही औषधे घेते. त्यावरून तमन्नाने स्पष्टीकरण दिले आहे की, या सर्व अफवा आहेत. माझ्या शरीराच्या कर्व्हवर काहीही परिणाम होणार नाही. माझे नैसर्गिक शरीर आणि आकार नेहमी असाच राहिला आहे. मी 15 वर्षांची असल्यापासून कॅमेर्यासमोर आहे. त्यामुळे काहीही लपवण्यासारखे नाही. लोकांनी विविध बॉडीटाईपमध्ये मला पाहिले आहे. प्रत्येक महिलेच्या शरीरात बदल होत असतात.
कोव्हिडने शरीरावर खूप परिणाम केला. वजन नियंत्रित राखणे कठीण झाले. मला भात, चपाती, डाळ आवडते. संधिवात आणि सूज येणे असे प्रकार होतात. मीही ते अनुभवले आहेत; पण माझ्या कर्व्हवर कुठलाही परिणाम होणार नाही. माझ्या हिप्स आणि कमरेचा आकार कायम आहे. कारण, माझी जन्मतःच अशी रचना आहे. मी जागतिक सौंदर्य मानकांनुसार जाऊ शकत नाही. आपला नैसर्गिक आकार आपण स्वीकारायला हवा. दरम्यान, तमन्ना आगामी काळात ‘व्हीव्हॅन’ चित्रपटात दिसणार आहे.