मनोरंजन

Ragini MMS 3 | तमन्नाचा ‘रागिनी एमएमएस 3’ अडचणीत?

पुढारी वृत्तसेवा

तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत असलेल्या एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस 3’ या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 2025 मध्ये तमन्ना या फ्रँचायझीच्या तिसर्‍या भागात झळकणार असल्याची घोषणा होताच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याआधीच तो अडचणीत सापडल्याची माहिती मिळत आहे.

‘रागिनी एमएमएस 3’चे दिग्दर्शन साहिर रजा करणार होते. मात्र, आता त्यांना प्रकल्पातून वगळण्यात आले आहे. साहिर रजा सध्या नेटफ्लिक्सवरील एका मालिकेत शो-रनर म्हणून कार्यरत आहेत. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या नव्या नियमांनुसार शो-रनरने दररोज सेटवर उपस्थित राहणे आवश्यक असल्याने ‘रागिनी एमएमएस 3’च्या शूटिंगवर त्याचा परिणाम झाला. या कारणामुळे निर्मात्यांनी रजांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

एकता कपूर या चित्रपटात पारंपरिक हॉरर-एरोटिका शैलीपासून दूर जात अधिक सुपरनॅचरल घटकांवर भर देण्याच्या तयारीत आहेत.‘रागिनी एमएमएस’ची सुरुवात 2011 मध्ये राजकुमार राव आणि काइनाज मोटिवाला यांच्या चित्रपटातून झाली. त्यानंतर 2014 मध्ये सनी लिओनीचा ‘रागिनी एमएमएस 2’ प्रदर्शित झाला. यातील ‘बेबी डॉल’ हे गाणे प्रचंड गाजले होते. दरम्यान, तमन्ना आगामी काळात सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा ‘व्हॅन’, तसेच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT