मनोरंजन

अजय देवगन-तबूच्या ‘औरों में कहा दम था’ची तारीख रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजय देवगन अखेरला 'मैदान' या चित्रपटात पाहण्यात आलं होतं. यामध्ये त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. पण, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारसा चालला नाही. आता अजय हा 'औरों में कहां दम था' मध्ये दिसणार आहे. पण, त्यांची जोडी पुन्हा एकदा अभिनेत्री तब्बूसोबत जमली आहे. अजय देवगनने 'औरों में कहां दम था'चे पहिले पोस्टर शेअर केले आहे. त्यासोबत तिने चित्रपटाच्या नव्या रिलीज तारखेची घोषणा केली आहे.

अधिक वाचा-

आज रिलीज होणार 'औरों में कहा दम था'चे टीजर

  • 'औरों में कहां दम था' आधी २६ एप्रिल, २०२४ रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार होती.
  • आता तारीख बदलण्यात आली असून हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट आता ५ जुलै, २०२४ रोजी रिलीज होईल.
  • अजयने पहिले पोस्टर शेअर करत सांगितले की, 'औरों में कहां दम था'चा टीजर आज (३१ मे) रोजी दुपारी १ वाजता रिलीज होईल.
  • या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे करत आहेत. हा अजय आणि त्याच्यासोबतचा पहिला चित्रपट आहे.

अधिक वाचा-

'औरों में कहां दम था' एक महाकाव्य संगीतमय रोमँटिक ड्रामा आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अजय देवगन दिसत आहेत. पोस्टरमध्ये तिचा लूक दिसत नाही. यामध्ये अजय पाठमोरा दिसत आहे. पण तो अजयच असल्याचे दिसते. त्याच्या डोळ्यावर चष्मा दिसतो.

चित्रपटात अजय देवगन – तब्बू शिवाय जिमी शेरगिल, सई मांजरेकर आणि शांतनु माहेश्वरी याचीही महत्वाची भूमिका आहे. नीरज पांडे दिग्दर्शित चित्रपटात शीतल भाटिया, नरेंद्र हीरावत आणि कुमार मंगत पाठक यांच्या पॅनोरमा स्टुडिओद्वारा निर्मित केला.

SCROLL FOR NEXT