तापसी पन्नू ही नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. ती नेहमी कोणत्याही मुद्द्यावर खुलेपणाने मत मांडत असते. आता तापसी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सिनेमाचा नायकच ठरवतो की चित्रपटात हिरोईन कोण असायला हवी, असा खुलासा तिने केला आहे. इतकेच नाही तर बड्या कलाकारासोबत झळकल्यानंतर फार कमी मानधन मिळते, असेही तिने म्हटले आहे. नुकतेच एका मुलाखतीत तापसी म्हणाली, आता तर प्रेक्षकांनाही माहीत झाले आहे की, बहुतेक चित्रपटांमध्ये हिरोईन कोण असेल हे नायक ठरवतो. काहीवेळेला यशस्वी दिग्दर्शक याला अपवाद ठरतात, पण ७५ टक्के हिरोईन कोण होणार यावर नायकाचा मोठा प्रभाव असतो. नायकाला चर्चेत असणारी आणि प्रेक्षकांना आवडणारी अभिनेत्री हवी असते. लोकांना वाटते की मी 'जुडवा' किंवा 'डंकी' या सारखे चित्रपट पैशासाठी केले, पण नाही, वस्तुस्थिती वेगळी आहे. अशा धारणांशी मी दररोज लढते असते. आतापर्यंत तापसीने अनेक बड्या कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'बदला' आणि शाहरुख खानसोबत 'डंकी' या सिनेमात अभिनय केला आहे. तापसीचे एका पाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होताना दिसतात. तापसी पन्नू ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. ती नेहमीच सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचे दिसून येते. ती नेहमीच चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत असते.