मुंबई : पुढारी ऑनलाईन
अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि जेनेलिया डिसूझा (Genelia D'souza) हे सोशल मीडियावरून चाहत्यांशी कनेक्ट राहतात. हे सेलिब्रिटी कपल (Bollywood celebrity couple) आपले काही फोटोज आणि व्हिडिओजही सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता जेनेलियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जेनलिया आणि तिचे फ्रेंड जमिनीवर पडून पडून झिंगाट डान्स करताना दिसत आहेत.
वाचा – शिक्षिकेने म्हटलं होतं तू गाण्यात नकोस, खूपचं घोगरा आवाज आहे; पण शकिरा झाली टॉपची सिंगर
जेनेलियाने एका पार्टीचा व्हिडिओ (video) शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शमिता बंगारगी, आशिष चौधरी, कुमकुम भाग्य फेम शब्बीर अहलुवालिया आणि त्याची पत्नी कांची कौल दिसत आहेत. रितेश आणि जेनेलियासोबत ही त्यांची मित्रमंडळी होती. या पार्टीमध्ये 'सैराट'मधील झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या डान्समध्ये सर्वजण इतके रंगून जातात की, जमिनीवर पडून हसून लोटपोट होतात.
अधिक वाचा – सडपातळ बांध्याच्या नथालिया कौरच्या हॉट फोटोंचा सोशल मीडियावर जलवा (Photos)
हा व्हिडिओ अडीच लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. लोकांनी व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाला ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. या कपलने 'तुझे मेरी कसम'मधून सुपरहिट एन्ट्री केली होती.