swara bhasker felt ashamed as hindu by ram janmbhoomi verdict texted sorry to muslim friend shahrukh khan salman khan
पुढारी ऑनलाईन : स्वरा भास्करने सांगितले की, २०१९ मध्ये राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर तिने शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान यांच्यासह आपल्या सर्व मुस्लिम मित्रांची माफी मागितली होती.
अभिनेत्री स्वरा भास्करने एक वादग्रस्त विधान केले आहे. तिने म्हटलंय की, २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमी वादावर निकाल दिला, तेव्हा हिंदू असल्याने त्यांना खूप वाईट वाटले होते. तिने असेही सांगितले की, निकाल आल्यानंतर लगेचच तिने आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यासह आपल्या सर्व मुस्लिम मित्रांची माफी मागितली होती. जाणून घेऊया स्वरा भास्करचे संपूर्ण वक्तव्य.
स्वरा भास्करचे संपूर्ण वक्तव्य
राम जन्मभूमी वादाबाबत बोलताना स्वरा भास्करने ‘द मिडनाइट आवर’ पॉडकास्टमध्ये सांगितले की, या निकालामुळे ती अस्वस्थ झाली होती. तिला हा निकाल योग्य वाटला नाही आणि आपल्या मुस्लिम मित्रांना आपण या निर्णयाशी सहमत नसल्याचे माहीत असावे, असे तिला वाटले.
त्यामुळे निकाल आल्यानंतर लगेचच तिपे आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यासह आपल्या सर्व मुस्लिम मित्रांशी संपर्क साधला आणि त्यांची माफी मागितली.
सोशल मीडियावर स्वरा भास्कर ट्रोल
स्वरा भास्करचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जात आहे. एका यूजरने लिहिले, ‘स्वरा भास्कर राम मंदिराच्या निकालामुळे अस्वस्थ झाली होती. कधी कधी मला तिच्यासाठी खरोखर वाईट वाटते. काम मिळण्याच्या आशेने ती रात्रंदिवस बॉलिवूडचे कौतुक करत असते, पण तरीही तिला कधी काम मिळत नाही.’
दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी काहीही बोलतात.’ तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘तुम्हाला हिंदू म्हणवून घेताना आम्हालाही लाज वाटते.’
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय होता?
९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सर्वानुमते जमीन राम मंदिराच्या उभारणीसाठी देण्याचा निर्णय दिला होता. न्यायालयाने केंद्र सरकारला सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डला मशिदीसाठी पाच एकर पर्यायी जमीन देण्याचे निर्देशही दिले होते.