Swara Bhaskar pudhari
मनोरंजन

Swara Bhaskar: स्वरा भास्करचं क्रश कोणावर? बड्या नेत्याच्या पत्नीचं नाव घेतल्याने सोशल मीडियावर टीकेची झोड

बेधडक विधानांनी लक्ष वेधणारी अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर

अमृता चौगुले

आधी अभिनय आणि त्यानंतर आपल्या बेधडक विधानांनी लक्ष वेधणारी अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. आताही ती तिच्या अशाच बेधडक विधानाने चर्चेत आली आहे. स्वराचे हे स्टेटमेंट वाचून तुमच्याही भुवया आश्चर्याने उंचावतील यात शंका नाही. (Latest Entertainment News)

एक मुलाखतीमध्ये स्वराने असे स्टेटमेंट केले आहे की जवळपास सगळेच लोक उभयलिंगी (Bisexual) असतात. स्वरा सध्या पती फहाद अहमद याच्यासोबत 'पती पत्नी और पंगा : जोडीयों का रिअलिटी चेक' या रिअलिटी शोमध्ये दिसत आहे.

यामध्ये ती म्हणताना दिसते की, विषमलैंगिकता आपल्यावर थोपवली गेली आहे. ही केवळ एक विचारधारा आहे. . जर आपण लोकांचे वास्तव जाणून घेतले तर आपण सगळेच उभयलिंगी आहे. हजारो वर्षे आपल्याला एका साच्यात बसवले आहे. त्याचीच आपल्याला सवय आहे. कारण मानव जमात यामुळेच पुढे जाईल.’

जेव्हा होस्टने तिला विचारले की तिची फिमेल क्रश कोण आहे? त्यावेळी तिने उत्तर दिले की समाजवादी पार्टीच्या सदस्या डिंपल यादव.

तिने पुढे सांगितले की अलीकडेच तिची आणि डिंपल यादव यांची भेट झाली. स्वराने यापुढे फिरकी घेताना सांगितले की 'तिने महाराष्ट्रमध्ये आपल्या पतीच्या करियरला अडचणीत आणले आहे.’ याशिवाय आता लैंगिकतेविषयीच्या तिच्या टिपणीविषयी उत्तर प्रदेशमध्येही याविषयी फारशी सकारात्मकता दिसत नाही.

ट्रोलरलाही सुनावली होती खरी खोटी

काही दिवसांपूर्वी स्वराने एका ट्रोलरला चांगलेच सुनावले आहे. या ट्रोलरने तिच्या पतीवर जातिवाचक कमेंट केली होती. स्वराने स्क्रीनशॉट शेयर केला आणि ती म्हणाली, हा मूर्ख स्वत:ला गौरवशाली हिंदू आणि आंबेडकरवादी असल्याचे सांगतो. त्याला माहिती नाही की छपरी हा एक जातीवादी शब्द आहे. एक अपमानास्पद ज्याचा वापर अशा समुदायासाठी केला जातो जे छप्पर किंवा गवताच्या झोपडी बनवतात. याशिवाय डोंगरी किंवा इतर ठिकाणी रस्त्यावरचा विक्रेता होणेही चुकीचे नाही. तू जातीवादी आहेस. स्वराने 2023 मध्ये फहाद अहमदसोबत मुलगी राबियाचे स्वागत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT