स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक एकत्र चित्रपटात दिसणार आहेत  instagram
मनोरंजन

'सुशीला-सुजीत' चित्रपट | स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक पहिल्यांदाच एकत्र

पुढील वर्षी प्रदर्शित होणार चित्रपट, शूटिंगला सुरुवात

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकताच मुहूर्त झाल्यानंतर ‘सुशीला-सुजीत’च्या चित्रीकरणाला धडाक्यात सुरुवात झालेली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रसाद ओक हे पहिल्यांदाच एकत्र येत असून चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या नावापासून सुरू झालेली उत्कंठा या चित्रपटात सुशीला कोण आणि सुजीत कोण, या बहुचर्चित प्रश्नापर्यंत ताणली गेली होती. मात्र, या दोन भूमिकांमध्ये कोण असणार? याचे उत्त्तर देताना निर्मात्यांनी सुशीलाच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी असेल तर सुजितच्या भूमिकेत स्वप्नील जोशी असेल असे नुकतेच जाहीर केले आहे. आता चित्रपटाशी संबंधित आणखी काही नाविन्यपूर्ण गोष्टींच्या घोषणा व्हायच्या आहेत.

स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे, निलेश राठी यांची निर्मिती असलेल्या ‘सुशीला-सुजीत’चा मुहूर्त गेल्या आठवड्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन पार पडला.

पहिल्यांदाच स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक एकत्र

पहिल्यांदाच स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक हे दोन अभिनेते मित्र पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. शिवाय स्वप्नील, सोनाली आणि प्रसाद पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत असल्याने चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स आणि पंचशील एन्टरटेन्मेंट्सची ही निर्मिती आहे. प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे हे पहिल्यांदाच एकत्र येवून चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. प्रसाद ओक हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत तर संजय मेमाणे हे सिनेमॅटोग्राफर, पटकथा-संवाद अजय कांबळे यांचे आहेत. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, “स्वप्नील आणि मला बऱ्याच दिवसांपासून एकत्र काम करायचे होते. जेव्हा प्रसादने मला ही कथा ऐकवली आणि सांगितले कि स्वप्नीलसुद्धा या चित्रपटात असणार आहे. हे ऐकल्यावर मी आनंदाने अक्षरशः उडीच मारली.”

“सोनाली आणि स्वप्नील हे थोडेसे वेगळे आणि फ्रेश असे कास्टिंग या चित्रपटासाठी आम्ही केले आहे. या दोघांची एक वेगळी अशी काम करण्याची पद्धत आहेत आणि त्यामुळे ही निर्मिती प्रक्रिया अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे,” असे उद्गार प्रसाद ओक यांनी काढले.

स्वप्नील जोशी म्हणाला, “प्रसाद, सोनाली आणि मी गेली कित्येक वर्षे एकमेकांना ओळखतो आणि आम्ही चांगले मित्र आहोत. पण आम्ही एकमेकांबरोबर काम केलेले नाही. दोनेक वर्षांपूर्वी प्रसाद एक चित्रपट दिग्दर्शित करत होता आणि मी त्यात काम करणार होतो. पण काही कारणामुळे ते काही जुळून आले नाही. मग ‘सुशीला-सुजीत’ची निर्मिती सुरु झाली आणि आम्हीही संधी साधायचीच असे ठरवून टाकले.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT