suvrat joshi viral post दिल्ली येथील जंतर मंतर वरील निट पेपर फूटीविरोधातील आंदोलनाचे लोन देशभर पोहचले आहे, यामध्ये मराठी कलाकारही आपल्या भावना सोशल मिडीयातून व्यक्त करत आहेत. काही आंदोलनाच्या विरोधात तर काही बाजूने पोस्ट करत आहेत. आता दिल दोस्ती दुनियादारी फेम अभिनेता सुव्रत जोशी यांच्या एका पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये त्याने सरकारच्या दिरंगाईबद्दल खरमरीत भाषेत पोस्ट लिहली आहे. एखादा धुरंदर ३ चित्रपट प्रर्दशित होण्याची आम्ही वाट पाहावी का त्यामध्ये सरकार आपली भूमिका सांगेलव सरकारचे धोरण आम्हाला कळेल का असे त्याने या पोस्टमधून म्हटले आहे.
काय म्हणाला आहे सुव्रत जोशी
कालपर्यंत Chinese agent असलेल्या, साधे वैज्ञानिक म्हणायला लायक नसलेल्या, थेट पाकिस्तान मध्ये जाऊन कॉन्फरन्स केलेल्या, स्वतःच्या नावावर एकही पेटंट नसलेल्या, केवळ स्वतःच्या NGO ला परदेशी फंडिंग मिळणार नाही हा क्षुल्लक कारणावरून..शिक्षणाचे कारण देऊन उपोषणाला बसलेल्या सोनम जी वांगचुक यांना अचानक काल रात्री भाजप चे प्रमुख स्वतः जाऊन उपोषण तोडायला मदत करतात. माननीय पंतप्रधान त्यांना तब्येत सांभाळायला सांगतात. आणि त्यांच्याबद्दल गौरवास्पद बोलतात.
अशा शब्दात त्याने सोनम वांगचूक यांच्यासह विद्यार्थी आंदोलनाला पाठींबा दिला आहे. तसेस केंद्र सरकारचा समाचार घेत सोनम वांगचूक यांना कालपर्यंत हिणवण्याचा प्रयत्न करणारे सरकार आज त्यांच्या उपोषणाची का दखल घेत आहे असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
केंद्र सरकारवर केली प्रश्नांची सरबत्ती
सुव्रत जोशी यांने आपल्या पोस्टमधून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली असून, यापूर्वी वांगचूक यांच्यावर केलेल्या आरोपांचाही समाचार घेतला आहे. तो म्हणतो की आता वांगचूक हे चिनी एजंट नाही आहेत का, त्यांची सरकारला आताच कशी आठवण येते इत्यादी प्रश्न त्याने उपस्थित केले आहेत.
सुव्रतने उपस्थित केलेले प्रश्न त्याच्याच भाषेत
सोनम जी आता Chinese agent आहेत की नाही?
उपोषणाच्या काळात त्यांना कुठलं सिरम देण्यात आलं का, ज्यामुळे त्यांचं आता अचानक " राष्ट्रीय संपत्ती" मधे रूपांतर झाले?
या मास्टर स्ट्रोक चा आम्ही आम्ही स्पिनर्स नी कसा अर्थ लावावा?
सोनम जीना पाठिंबा दाखवणारे "आम्ही किडे" आता फुलपाखरू झालो का?
पोस्ट व्हायरल करण्याचे आवाहन
ही पोस्ट व्हायरल करुन माझ्या प्रश्नांचे उत्तर मला शोधून द्यावे असे आवाहनही सुव्रतने शेवटी केले आहे. या उत्तरासाठी आता एकादा ‘धुरदंर ३’ प्रदर्शित होण्याची वाट आम्ही पाहयची का असेही तो म्हणला आहे, कारण सरकार अशा चित्रपटातून आपल्या भूमिका मांडत आहे असे त्याला कदाचित म्हणायचे आहे.