इशान खट्टर आणि विशाल जेठवा यांची मुख्य भूमिका असलेल्या होमबाउंड या सिनेमाची सध्या चर्चा आहे. अलीकडेच माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे या सिनेमाच्या स्क्रीनिंगला उपस्थित राहिले होते. हा सिनेमा भारताकडून ऑस्करसाठी ऑफीशियल एंट्री म्हणून पाठवला गेला आहे. त्यानिमित्ताने असलेल्या स्क्रीनिंगला माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे उपस्थित होते. पण केवळ त्यांनीच नाही तर यावेळी लाईमलाइट खेचून घेतली ती जान्हवी कपूरने. (Latest Entertainment News)
यावेळी जान्हवीने आई श्रीदेवीची साडी नेसली होती. तसेच यावेळी तिची बॉयफ्रेंड शिखर पहारिया याच्या कुटुंबासोबत असलेले बॉंडिंगही चर्चेचा विषय ठरले. अर्थात या सगळ्यांसोबत शिखर दिसला नाही. पण या कार्यक्रमाला त्याची आई, आजोबा सुशील कुमार शिंदे आणि त्यांची पत्नी हजर होते.
सुशील कुमार शिंदे यांच्या पत्नीला जान्हवीने वाकून नमस्कार केला. यानंतर तिने सगळ्यांसोबत फोटोही पोझही दिली.
या कार्यक्रमात जान्हवी इतकीच शिखरच्या आई स्मृती पहारिया यांच्या स्टायलिंगचे कौतुक होत आहे. लाल सिल्कची साडी नेसलेल्या स्मृति पहारिया कार्यक्रमात लक्षवेधी दिसत होत्या.
जान्हवीने शिखरच्या आजी आजोबांचा केलेल्या चरणस्पर्शामुळे सोशल मिडियावर मात्र नेटीझन्स तिचे चांगलेच कौतुक करत आहेत. संस्कार चांगले आहेत तिचे अशी कमेंट यावेळी एकाने केली आहे. तर एकाने लग्न कधी करणार अशी विचारणाही केली आहे. जान्हवी गेले काही दिवस शिखर पहारियाला डेट करते आहे. शिखरचा मोठा भाऊ वीरनेही अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. जान्हवी अलीकडेच परमसुंदरी या सिनेमात दिसली होती. यामधील तिच्या कामाचे कौतुकही झाले.