पुढारी ऑनलाईन डेस्क - सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याची प्रेयसी आणि बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली आहे. अलीकडेच, सीबीआयने या प्रकरणात आपला क्लोजर रिपोर्ट जारी केला होता, ज्यामध्ये रियाला क्लीन चिट देण्यात आली आहे. आता यावर अनेक बॉलिवूड स्टार्स आपली प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये, बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा, उर्फी जावेद आणि सोनी राजदान यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अहवाल समोर आल्यानंतर दिया मिर्झाला संताप अनावर झाला. तिने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, 'मीडियाने रिया चक्रवर्तीला त्रास दिला'. अभिनेत्रीने पुढे लिहिले की, 'रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाची लेखी माफी मागण्याची हिंमत मीडियामध्ये कोणाकडे आहे?' तुम्ही त्यांना विच हंट म्हणत होता, तुमच्या टीआरपीसाठी तुम्ही एका मुलीचे करिअर उद्ध्वस्त केले, माफी मागा, तुम्ही लोक हे कमीत कमी करू शकता.
दियासोबतच उर्फी जावेद आणि सोनी राजदान यांनी आपले मत मांडले आहे. फॅशन एन्फ्ल्युएन्सर उर्फी जावेद देखील रियाची फॅन झाली. तिने रियाचे कौतुक करत पोस्ट केले. तिने इन्स्टाग्रामवर लिहिलं- तू या सर्वांच्यामध्ये स्वत:ला इतकं सावरलंस, ते खूपच प्रेरणादायी आहे.
दरम्यान रिया चक्रवर्ती परिवार सोबत सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचली. तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यावेळी ती गरीब मुलांना मदत करताना दिसली.
video- viralbhayani instaवरून साभार