अभिनेत्री सुषमा शिरोमणींचे खास चित्रपट पाहता येणार  Instagram
मनोरंजन

Marathi OTT वर पाहता येणार अभिनेत्री सुषमा शिरोमणींचे खास चित्रपट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अल्ट्रा झकास OTT वर मराठी चित्रपटप्रेमींसाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांचे लोकप्रिय चित्रपट पाहता येणार आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी बालकलाकार म्हणून १९५८ साली चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. सहनायिकापासून ते प्रमुख नायिकापर्यंतचा त्यांचा अनुभव चौफेर आहे. मराठी रुपेरी पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी आतापर्यंत सात मराठी चित्रपटांचे निर्मिती व दिग्दर्शन केले आहे, त्यापैकी हे पाच सुपरहिट मराठी चित्रपट 'भिंगरी', 'फटाकडी', 'मोसंबी नारंगी', 'भन्नाट भानु' आणि 'गुलछडी' आता प्रेक्षकांना अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर पाहता येतील.

निर्मात्या, दिग्दर्शक आणि महाराष्ट्र शासनातर्फे २०१९-२० साली चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरवच्या पुरस्कारकर्त्या म्हणून त्यांची ख्याती आहे.

यावेळी सुषमा शिरोमणी म्हणाल्या, "माझ्या चित्रपटांची निवड केल्याबद्दल मला खूप अभिमान आहे. हे चित्रपट माझ्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे दर्शवतात. तसेच या चित्रपटांनी मला एक कुशल लेखिका, निर्माती, दिग्दर्शिका आणि वितरक बनण्यास मदत केली आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासात पहिल्यांदाच मी बॉलीवूड चित्रपटांतील दिग्गज कलाकार रेखा जी, जितेंद्र जी, मौसमी चॅटर्जी जी, अरुणा इराणी जी आणि रती अग्निहोत्री यांसारख्या दिग्गज बॉलीवूड कलाकारांसोबत मराठी आयटम सॉंग्स सादर केले आहेत. बॉलीवूड कलाकारांच्या या सहकार्याने मराठी चित्रपटांची प्रतिष्ठा उंचावली आहे. मराठी ओटीटीच्या माध्यमातून हे 'गोल्डन जुबली' चित्रपट जगभरात पाहता येणार याचा मला आनंद आहे. मला विश्वास आहे कि हे चित्रपट नव्या पिढीला तितकेच आवडतील.”

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT